मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nilesh Rane : भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मुलगा निलेश राणे शिवसेनेत जाणार आहेत.

Nilesh Rane will join Shiv Sena Shinde group : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nilesh Rane

Nilesh Rane will join Shiv Sena Shinde group : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे आता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये भाजपमध्ये आले

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Maharashtra Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपला विजय निश्चित करण्यासाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. निवडणुकीपूर्वी पक्ष बदलण्याचा खेळही सुरू आहे. दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे Naryan Rane यांचे पुत्र नीलेश राणे Nilesh Rane यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करून Shiv Sena Shinde group निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी (22 ऑक्टोबर) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.कुडाळ मतदारसंघ शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळेच नीलेश भाजपमधून शिवसेनेत जात आहेत.

शिवसेनेचे (ठाकरे) वैभव नाईक हे कुडाळचे विद्यमान आमदार आहेत. ते राणेंचे जुने प्रतिस्पर्धी मानले जातात. कुडाळ विधानसभा नारायण राणे यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. जवळच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व निलेश यांचे धाकटे बंधू नितीश राणे हे भाजपसोबत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातून भाजपने माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

निलेश राणे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2009 ते 2014 या काळात ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा: Maharashtra Vidhan Sabha Election : शिवसेनेने 45 जागांची यादी जाहीर केली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार!

हेही वाचा: Mumbai Drug News : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध!

शेअर करा