मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nepal News: नेपाळच्या महापुरात ९१९ जणांचा मृत्यू

Nepal News: काठमांडू : भोटे कोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत ९१९ जणांचा मृत्यू झाला असून, ४,२०० हून अधिक जण बेपत्ता आहेत.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

नेपाळच्या महापुरात ९१९ जणांचा मृत्यू ४,२०० हून अधिक बेपत्ता; अज्ञात मृतदेह दफण करण्यास सुरुवात
नेपाळच्या महापुरात ९१९ जणांचा मृत्यू ४,२०० हून अधिक बेपत्ता; अज्ञात मृतदेह दफण करण्यास सुरुवात

Nepal News: ४,२०० हून अधिक बेपत्ता; अज्ञात मृतदेह दफण करण्यास सुरुवात

Nepal News: काठमांडू : भोटे कोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुरामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत ९१९ जणांचा मृत्यू झाला असून, ४,२०० हून अधिक जण बेपत्ता आहेत. मृतदेहांची ओळख पटविणे आणि ते जतन करणे प्रशासनासमोरील मोठे आव्हान बनले आहे. ओळख न पटलेल्या मृतदेहांच्या दफनासाठी चितवनमधील देवघाट जंगलात शेकडो कबरी तयार करण्यात आल्या असून, दोन दिवसांत १९६ मृतदेह दफन करण्यात आले आहेत. बराच काळ पाण्यात राहिल्यामुळे अनेक मृतदेह कुजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. प्रत्येक मृतदेहाला स्वतंत्र ओळख क्रमांक देऊन त्याची नोंद केली जात आहे. त्यानंतर डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवून संबंधित मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.हजारो नागरिक अद्याप बेपत्ता असल्यामुळे मृतदेहांची छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू आणि डीएनए नमुन्यांच्या आधारे ओळख पटविण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. सशस्त्र पोलीस दलाकडून मृतदेह दफनभूमीपर्यंत नेले जात आहेत.https://maharashtramirror.com/ Nepal News
नेपाळ-चीन व्यापारमार्ग उद्ध्वस्त
पुरामुळे नेपाळ आणि चीनमधील महत्त्वाच्या ‘रसुवागढी-केरुंग’ सीमा मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सीमाचौकी, दोन्ही देशांना जोडणारा मैत्री पूल आणि तिमुरे भागाचा मोठा हिस्सा उद्ध्वस्त झाला आहे. चीनमधून मोठ्या प्रमाणात माल याच मार्गाने नेपाळमध्ये आणला जातो. मार्ग बंद झाल्यामुळे मालवाहतूक विस्कळीत झाली असून, व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.https://maharashtramirror.com/ Nepal News
९० टक्के भागात वीजपुरवठा पूर्ववत
नुवाकोटमधील पूरग्रस्त क्षेत्रांपैकी सुमारे ९० टक्के भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. रसुवामध्येही वीजपुरवठा सुरू करण्याचे काम वेगाने केले जात आहे. वीज आणि प्रकाशाची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी दोन किलोवॉट क्षमतेच्या संस्थात्मक सौर ऊर्जा प्रणाली आणि प्रत्येकी २० वॉट क्षमतेचे ५०० सौर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे साहित्य एकखिडकी पद्धतीने आपत्तीग्रस्त भागांत पाठविण्यात आले.https://maharashtramirror.com/ Nepal News
सरोवर फुटण्याचा धोका टळला
नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदी कोसळल्यानंतर तयार झालेल्या तात्पुरत्या सरोवरातील पाणी नैसर्गिकरीत्या वाहून गेले आहे. त्यामुळे सरोवर फुटून खालच्या भागात पुन्हा अचानक पूर येण्याचा धोका सध्या टळला आहे. चोचेन खोला आणि पुरेपु त्सांगपो नद्यांच्या संगमाजवळ तयार झालेल्या या सरोवरात सुमारे २० लाख घनमीटर पाणी साचले होते.https://maharashtramirror.com/ Nepal News
सद्गुरूंकडून एक कोटींची मदत
सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी नेपाळमधील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान आपत्ती निवारण निधीत एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. हिमालयीन क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्याचे नियोजन करण्यासाठी भारत, चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतान यांचा समावेश असलेले संयुक्त ‘हिमालयीन मंडळ’ स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी पुरातील मृत, बेपत्ता नागरिक आणि बाधित कुटुंबांसाठी विशेष प्रार्थना केली.

शेअर करा