मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sharad Pawar Group : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पहिली उमेदवार यादी जाहीर केली, सुप्रिया सुळेंसह ५ उमेदवारांना तिकीट

NCP Sharadchandra Pawar first Candidate List : सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar NCP Second List

NCP Sharadchandra Pawar first Candidate List  : सुप्रिया सुळे बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) आणखी चार जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

मुंबई :- शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) Sharad Pawar Group लोकसभा निवडणुकीसाठी 2024 Lok Sabha Election च्या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे सर्व उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे.याशिवाय वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव बागरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे आणि आहमनगरमधून नीलेश लंके यांना तिकीट देण्यात आले आहे.

महाविकास आघाडी (MVA) अंतर्गत पक्षाला 10 जागा मिळतील आणि लवकरच सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र यांनी सांगितले होते. शुक्रवारी बैठक झाली असून या बैठकीत लोकसभेच्या 10 जागांवर चर्चा करण्यात आली. दोन दिवसांनंतर आज म्हणजेच शनिवार 30 मार्च रोजी पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

शेअर करा