मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

NCP News : अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून निलंबनाची कारवाई

Ncp ajit pawar group suspend mla satish chavan : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची टीका होत आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

NCP News : अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून निलंबनाची कारवाई

Ncp ajit pawar group suspend mla satish chavan : राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्याची टीका होत आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार गटाने सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार Sharad pawar आणि अजित पवार Ajit Pawar यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार सतीश चव्हाण mla satish chavan यांना निलंबित केले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सतीश चव्हाण यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. Ncp ajit pawar group suspend सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते मुंबईत गेले होते. सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले की, आमदार सतीश चव्हाण यांना जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल आणि पक्षाची शिस्त मोडल्याबद्दल सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. सध्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चुरस आहे. अजित पवार यांनी शरद पवारांपासून वेगळे होऊन महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. सध्या महाराष्ट्रात अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सुरू आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : काँग्रेस आणि आमच्यातली जागावाटपाच्या संदर्भातली चर्चा अद्याप थांबली नाही

शेअर करा