मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! 'रेशमा केमिकल्स' कंपनीला आगीचं जबर नुकसान

•सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai MIDC Fire : तुर्भे एमआयडीसीत भीषण आग! 'रेशमा केमिकल्स' कंपनीला आगीचं जबर नुकसान

•सकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत ज्वालाग्राही रसायनांमुळे आगीने घेतलं उग्र रूप

नवी मुंबई :- तुर्भे एमआयडीसीतील इंदिरानगर परिसरात असलेल्या ‘रेशमा ऑर्गेनिक केमिकल्स’ या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज पहाटे सकाळी 4.37 वाजता अचानक आग लागली. रासायनिक साठा आणि ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.

ही कंपनी भूखंड क्रमांक D-61 वर असून, तिथे असलेल्या प्लांटमध्ये स्फोटक आणि ज्वालाग्राही रसायनांचा मोठा साठा होता. नेरुळ अग्निशमन दल पाच मिनिटांत घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, आग इतकी प्रचंड होती की लगेचच वाशी आणि सीबीडी बेलापूर येथूनही अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली, याचा नेमका कारण अजून अस्पष्ट आहे. तसेच, हानीचे अंदाजे प्रमाण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही.

सुदैवाने, या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची नोंद अद्यापपर्यंत झालेली नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन विभागाने दिली. मात्र, रासायनिक संयंत्र असल्यामुळे परिसरात धुराचे प्रमाण वाढले असून आसपासच्या परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अग्निशमन दलाच्या अंदाजानुसार, आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवायला किमान दोन तास लागतील. दरम्यान, अग्निशमन अधिकाऱ्यांकडून कंपनीतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आगीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Mumbai Rain Update : पावसाचा तडाखा! राज्यभर मुसळधार, पालघर रेड अलर्टवर – मुंबई, विदर्भातही धोक्याची घंटा

शेअर करा