मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Crime News : पोलीस ठाण्याच्या सावलीत दरोडा! वाशीत कारफोडी करून पाच लाखांची रोकड लंपास

• विशेष पथक स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तेवढ्यात पोलीस ठाण्याच्या शेजारीच चोरीची घटना

V
Vivek

1 मिनिट वाचन

Crime News

•विशेष पथक स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तेवढ्यात पोलीस ठाण्याच्या शेजारीच चोरीची घटना

नवी मुंबई | नवी मुंबईतील वाढत्या चोरीच्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक भर पडली आहे. वाशी पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही फुटांवर, वर्दळीच्या ठिकाणी उभी असलेली कार फोडून पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरांनी लंपास केली. या घटनेने पोलिस यंत्रणेच्या सुरक्षा योजनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. वकील व्यवसायिक शुभेन्दू पटनाईक यांनी नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन समोर आपली कार पार्क केली होती. काही वेळाने दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी गाडीच्या मागील काचेवर दगड मारून ती फोडली व कारमधील 5 लाखांची रोकड घेऊन क्षणार्धात पसार झाले.

नवी मुंबईत अशा प्रकारच्या चोऱ्यांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाली आहे. भुरट्या चोरांपासून सराईत टोळ्यांपर्यंत सर्व प्रकारचे चोर सक्रिय झाल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काही दिवसांपूर्वीच विशेष पथकाची स्थापना केली होती. मात्र, त्या पथकाची प्रभावी अंमलबजावणी अद्याप दिसून आलेली नाही, हे या घटनेतून स्पष्ट होते.

या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Mumbai Accident News : रस्त्यावर जीवघेणं संकट! अंधेरीत रिक्षाच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू

शेअर करा