मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Accident News : रस्त्यावर जीवघेणं संकट! अंधेरीत रिक्षाच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू

• अपघातानंतर चालकाने घेतली पळ काढ, पोलिसांनी काही तासांत लावला छडा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Accident News : रस्त्यावर जीवघेणं संकट! अंधेरीत रिक्षाच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू

•अपघातानंतर चालकाने घेतली पळ काढ, पोलिसांनी काही तासांत लावला छडा

मुंबई | अंधेरी-कुर्ला रोडवर मेट्रो स्टेशन क्रमांक 4 जवळ सोमवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता ओलांडत असताना एका अंदाजे 60 वर्षीय वृद्धाला भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. यात ते जागीच कोसळले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी वृद्धाला डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक तपासात समोर आलं की, मृतक गेल्या काही दिवसांपासून परिसरात फिरत होता आणि उपजीविकेसाठी भिक्षा मागत होता.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एका रिक्षाने वृद्धाला उडवल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्या रिक्षाचा नंबर ओळखून काही तासांत चालकाला ताब्यात घेतलं. चालकाचं नाव सोहराब महफूज हुसैन शेख असं असून, त्याने अपघात कबूल केला आहे. रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: Malvan News : शंभरीही पार न करता चबुतरा खचला! मालवणच्या राजकोट किल्ल्यावर सरकारी बांधकामावर प्रश्नचिन्ह

शेअर करा