Navi Mumbai Crime News : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा छडा ; पोलीस हवालदार, पोलीस शिपाई, कस्टम अधिकारी सूत्रधार!
•नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे.
2 मिनिट वाचन

•नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची आहे. दहा आरोपींना अटक
नवी मुंबई :- आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेच दोन पोलिस आणि एक कस्टमचा अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह चालवत होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करत 10 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस हवालदार, 1 कस्टम अधीक्षक आणि अन्य सहा आरोपींचा समावेश आहे. या रॅकेटचा भांडाफोड बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या तपासातून झाला. हे रॅकेच समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी ही चक्रावून गेले आहेत.
हे रॅकेट थायलंडसह परदेशातून हायड्रो गांजा भारतात आयात करत होते. त्यानंतर तो मुंबई आणि नवी मुंबईत आणला जायचा. त्याचा साठा ही नवी मुंबईत केला जात होता. तिथूनच तो गांडा संपूर्ण देशात वितरित केला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त केला आहे. शिवाय या प्रकरणात एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची आहे.
या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात समोर आले की, खारघर पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन भालेराव याचा गुरुनाथ चिचकर यांच्याशी सातत्याने संपर्क होता. तपासाची कल्पना लागताच तो मूळ गावी पळून गेला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला तिथून अटक केली. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन भालेराव, पोलीस हवालदार संजय फुलकर आणि कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना अटक केली आहे. अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
नेरूळला गांज्याची विक्री होत आहे, नवी मुंबई पोलिसांना समजले होते. तिथे तिघे जण होते. त्या पैकी एक जण फरार झाला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बरीच माहिती समोर आली. हे ड्रग्ड अमेरिका किंवा थायलंड वरून मागवले जात होते. ते एअरपोर्टवर आल्यानंतर तिथे कस्टमचा माणूस ते क्लिअर करत असे. नंतर त्याचा ताबा एजंटला दिला जात असे. पुढे ते ड्रग्ज पैसे देणाऱ्या माफियांना दिले जात. नंतर त्याचे वितरण देशात वेगवेगळी लोकं करत होती हे या चौकशीत समोर आले आहे.
गुन्हयाचे तपासामध्ये अटक केलेले आरोपी
1.आशिष रमेश गवारे, (वय-22 रा. नेरूळ, नवी मुंबई)
2.अहमद खालेद ऑलगी, (वय-23 रा. नेरूळ, नवी मुंबई)
3.साहील शब्बीर लांबे, (वय-27 रा. नेरूळ, नवी मुंबई)
4.सुजित रघुनाथ बंगेरा, (वय-28 (२ वेळा हॉकी नॅशनल प्लेअर)
5.कमल जयकिशन चांदवाणी, (वय-56 रा. खारघर, जि. रायगड)
6.सचिन बाबुराव भालेराव, ,(वय-,40 रा. कामोठे), (पोलीस हवालदार )
7.संजय फुलकर, (वय 36 रा. खांदा कॉलनी), (पोलीस नाईक)
8.अंकित पितांबरभाई पटेल, (वय 37 रा. वाशी, नवी मुंबई) (आंगडीया)
9.रिकुंदकुमार दिनेशभाई पटेल (वय-39, रा. वाशी) (आंगडीया)
10.प्रशांत विनोद गौर (वय-40 रा. खारघर, अधीक्षक कस्टम, परदेशी टपाल कार्यालय मुंबई)




