मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : भाविकांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; पर्वणी स्नानापासून प्रवासापर्यंतची माहिती मिळणार एका क्लिकवर

Nashik News : नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : भाविकांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; पर्वणी स्नानापासून प्रवासापर्यंतची माहिती मिळणार एका क्लिकवर
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : भाविकांसाठी आनंदाची बातमी! नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; पर्वणी स्नानापासून प्रवासापर्यंतची माहिती मिळणार एका क्लिकवर

Nashik News : नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर या भव्य धार्मिक सोहळ्याला औपचारिक सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने भाविकांसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे आता कुंभमेळ्याशी संबंधित महत्त्वाची माहिती भाविकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.https://maharashtramirror.com/ Nashik News

ध्वजारोहण सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राज्यातील अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याचे अधिकृत टायटल साँग आणि संकेतस्थळाचेही लोकार्पण करण्यात आले..https://maharashtramirror.com/ Nashik News

पर्वणी स्नानाच्या तारखांपासून सुरक्षेच्या सूचनांपर्यंत माहिती

कुंभमेळ्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, धार्मिक स्थळांची माहिती आणि भाविकांसाठी आवश्यक सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच प्रवासाचे नियोजन, वाहतुकीचे पर्याय, निवास व्यवस्था आणि विविध सुविधांची माहितीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, इतिहास, परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांची माहितीही या संकेतस्थळावर मिळणार आहे. विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कसे पोहोचावे, याची माहिती भाविकांना मिळू शकेल.

वैद्यकीय मदत, वाहनतळ आणि आपत्कालीन सुविधांची माहिती

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, वाहनतळ, निवास व्यवस्था आणि मदत कक्षांची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षेसंबंधी सूचनांनाही संकेतस्थळावर प्राधान्य दिले जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या

सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित अचूक आणि अधिकृत माहिती मिळावी, हा संकेतस्थळ सुरू करण्यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी शासकीय विभाग, महापालिका, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक आणि प्रसारमाध्यमांनी संकेतस्थळाची माहिती अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिकृत संकेतस्थळ : https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असताना या संकेतस्थळामुळे भाविकांना कुंभयात्रेचे नियोजन करणे अधिक सोपे होणार असून, आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेअर करा