मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का: बागूल, राजवाडे भाजपमध्ये दाखल!

• महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली; गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वाजतगाजत प्रवेश

V
Vivek

2 मिनिट वाचन

Nashik News : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का: बागूल, राजवाडे भाजपमध्ये दाखल!

•महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली; गिरीश महाजनांच्या उपस्थितीत वाजतगाजत प्रवेश

नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नुकतेच हकालपट्टी झालेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ, ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागूल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी रविवारी (27 जुलै) भाजपमध्ये वाजतगाजत प्रवेश केला. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला. या वेळी महाजन यांनी बागूल यांना "हा शेवटचा प्रवेश आहे, आता इकडेतिकडे जाऊ नका," असा सल्ला देत टोलाही लगावला.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे पक्ष सध्या विरोधी पक्षांतील, विशेषतः ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी आक्रमक झाले आहेत. मात्र, या पक्षप्रवेशांवरून ठाकरे गट भाजपवर गंभीर आरोप करत आहे. ठाकरे गटाच्या मते, भाजप आधी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करते आणि नंतर त्यांचा पक्षात प्रवेश घडवते. या आरोपांसाठी त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप असलेले सुधाकर बडगुजर आणि महिनाभरापूर्वी मारहाण व चोरीचा गुन्हा दाखल झालेले बागूल व राजवाडे यांचा दाखला दिला. विशेष म्हणजे, बागूल आणि राजवाडे यांच्याविरुद्धची तक्रार देणाऱ्याने अचानक आपली तक्रार मागे घेतली असून, हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यानेच तक्रार मागे घेतल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले होते.बागूल समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रचंड गर्दी जमवून आपले शक्तिप्रदर्शन केले. या वेळी भाजपचे स्थानिक आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे देखील उपस्थित होते.

"नाशिक भाजप आता हाऊसफुल": गिरीश महाजन

सुनील बागूल आणि मामा राजवाडे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) सर्वच प्रमुख पदाधिकारी आता भाजपमध्ये आले आहेत, त्यांच्याकडे आता अध्यक्ष होण्यासही कोणी तयार नाही." त्यांनी ठाकरे गटाचे सध्याचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत नाशिक भाजप आता 'हाऊसफुल' झाल्याचे सांगितले. खासदार संजय राऊत यांचा थेट नामोल्लेख न करता महाजन यांनी त्यांच्यावरही टीका करत त्यांच्या पक्षाची बिकट अवस्था झाल्याचे नमूद केले. सुनील बागूल यांनी यावेळी बोलताना, "आता भाजपमध्ये प्रवेश करणे सोपे राहिलेले नाही, संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी आणि पोलीस नोंदी तपासल्या जातात. सर्व अनुकूल असेल तरच प्रवेश मिळतो," असे सांगितले.

शेअर करा