मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nanded News : नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला, 8 जणांचा मृत्यू

•नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nanded News

•नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नांदेडच्या आलेगाव शिवारात घडली. घटनास्थळी बचाव पथक हजर आहे.

नांदेड :- नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. येथे महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत पडला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडच्या आलेगाव शिवारात हा भीषण अपघात झाला. या विहिरीत काही महिला अडकल्या असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड परिसरातील आलेगाव येथे सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यात महिला मजूर ट्रॅक्टरवरून हळद काढण्यासाठी शेताकडे जात होत्या. वाटेत विहीर आहे याची चालकाला कल्पना नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला.

ट्रॅक्टर विहिरीत पडताच आरडाओरडा झाला. यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. अनेक महिला विहिरीत बुडाल्या. त्यामुळे मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तर विहिरीत पडलेल्या इतर महिलांची सुटका सुरू आहे. रेस्क्यू टीम दोरीच्या सहाय्याने महिलांना विहिरीतून बाहेर काढत आहे.बचाव कार्यादरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

हेही वाचा: Sanjay Raut : वक्फ विधेयकाबाबत संजय राऊत यांचा भाजपवर टोला, 'जिनांनीही मुस्लिमांना कधीच वागणूक दिली नाही…'

शेअर करा