मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nana Patole : नाना पटोले यांचा मोठा दावा, 'लाडकी बहिण योजनेचा फायदा इतर राज्यातील महिला करत आहेत…'

Nana Patole On Ladki Bhain Yojana : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nana Patole : नाना पटोले यांचा मोठा दावा, 'लाडकी बहिण योजनेचा फायदा इतर राज्यातील महिला करत आहेत…'

Nana Patole On Ladki Bhain Yojana : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक मुद्द्यांवरून राज्यातील विद्यमान सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहिण योजनेबाबत मोठा दावा केला.

नागपूर :- महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी शुक्रवारी महायुती सरकारच्या मंत्र्यांना घेरले आणि राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या Ladki Bhain Yojana अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले.नाना पटोले म्हणाले, "इतर राज्यातील महिलांनी आणि अगदी बांगलादेशी नागरिकांनीही बनावट कागदपत्रांद्वारे लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे."

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा लाभही महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळाला.

महायुती सरकारमधील 65 टक्के मंत्र्यांवर अनेक आरोप असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात शपथ घेतली पण बहुतांश मंत्र्यांनी अद्याप कामाला सुरुवात केलेली नाही.बीडच्या सरपंचाच्या हत्येच्या घटनेनंतर विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करत असतानाच पटोले यांचे हे वक्तव्य आले आहे कारण या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी मुंडेंच्या जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सोयाबीन, कापूस, कांदा आणि दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असून बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेअर करा