मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nagpur news : नागपूरच्या १४५ वर्षांच्या मारबत उत्सवाची अनोखी परंपरा

Nagpur News : नागपूर : नागपुरात ऐतिहासिक मारबत उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

नागपूरच्या १४५ वर्षांच्या मारबत उत्सवाची अनोखी परंपरा
नागपूरच्या १४५ वर्षांच्या मारबत उत्सवाची अनोखी परंपरा

Nagpur News : नागपूर : नागपुरात ऐतिहासिक मारबत उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मारबतचे दर्शन घेतल्याने इडा-पिडा टळते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. या पारंपरिक उत्सवाला दरवर्षी मोठी गर्दी होत असून, आजची ऐतिहासिक मारबत मिरवणूक पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.https://maharashtramirror.com/ nagpur news
पारंपरिक सणांच्या गर्दीत नागपूरचा मारबत उत्सव मात्र आपल्या अनोख्या सामाजिक आणि राजकीय भाष्यामुळे वेगळी ओळख निर्माण करतो. तब्बल १४५ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात यंदाही भ्रष्टाचार, महागाई, राजकारण, सामाजिक प्रश्न आणि पाकिस्तानपर्यंतच्या मुद्द्यांवर बडग्यांच्या माध्यमातून उपरोधिक प्रहार करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Nagpur News
नागपूरच्या इतवारी आणि महाल परिसरातून तान्हा पोळ्याच्या दिवशी ऐतिहासिक मारबत आणि बडग्यांची मिरवणूक काढण्यात येते. पावसाचे वातावरण असतानाही नागरिकांचा उत्साह कायम आहे. ‘ईडा, पीडा, रोगराई घेऊन जा गे मारबत’ अशा पारंपरिक घोषणांसोबतच काळानुसार समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवरही या मिरवणुकीतून भाष्य केले जाते.https://maharashtramirror.com/ Nagpur News

बडगे ठरतात आकर्षणाचे केंद्र


या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘बडगे’. समाजातील एखादी समस्या, राजकीय घडामोड किंवा चर्चेतील व्यक्ती यांच्यावर उपरोध आणि निषेध व्यक्त करणारे पुतळे म्हणजे बडगे. त्यामुळे दरवर्षीच्या बडग्यांमध्ये त्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब पाहायला मिळते.
यंदा मस्कासाथ येथील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्यावर टीका करणारा बडगा तयार केला आहे. तर भालदारपुऱ्यातील मंडळाने महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला आहे. चकना चौकातील बडग्यातूनही स्थानिक राजकीय घडामोडींवर उपरोधिक भाष्य करण्यात आले आहे.
परंपरेला इतिहासाची किनार
साधारण १८८५ च्या आसपास या परंपरेला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. बकाबाईंच्या ब्रिटिशांशी असलेल्या संबंधांच्या निषेधातून ‘काळी मारबत’, तर ब्रिटिशांविरोधात जनजागृती करण्यासाठी जगन्नाथ बुवा यांनी ‘पिवळी मारबत’ सुरू केल्याच्या कथा प्रचलित आहेत.
काळानुसार मारबत आणि बडगे हे लोकभावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले. मिरवणुकीनंतर त्यांचे विसर्जन करून शहरातील रोगराई, संकटे आणि नकारात्मकता दूर जावी, अशी श्रद्धा आहे.

शेअर करा