मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Weather Update : मुंबईत मोसमी पावसाआधीच धुवाधार! नरिमन पॉईंटला अवघ्या तासाभरात 104 मिमी पाऊस*

Mumbai Weather Update Rain News : हवामान विभागाचा रेड अलर्ट, शहरातील जनजीवन विस्कळीत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Weather Update : मुंबईत मोसमी पावसाआधीच धुवाधार! नरिमन पॉईंटला अवघ्या तासाभरात 104 मिमी पाऊस*

Mumbai Weather Update Rain News : हवामान विभागाचा रेड अलर्ट, शहरातील जनजीवन विस्कळीत

मुंबई :- मोसमी पावसाची अधिकृत नोंद अद्याप झाली नसली, तरी मुंबईकरांनी आज पावसाच्या तडाख्याचा अनुभव घेतला. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने सोमवारी सकाळी नरिमन पॉईंट परिसराला अक्षरशः जलमय केले. केवळ सकाळी 9 ते 10 या एक तासात या भागात तब्बल 104 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

रविवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरू; रस्ते जलमय, कामकाजावर परिणाम

हवामान विभागानुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीसह मुंबईमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे मुंबईसाठी 'रेड अलर्ट'जारी करण्यात आला असून, पुढील काही तासांत अजून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील अनेक भागांमध्ये गटारांचे पाणी रस्त्यावर आले असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कामावर निघालेल्या नागरिकांची मोठी तारांबळ झाली असून, अनेकांनी ऑफिसला पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ घेतला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तास मुंबईकरांसाठी आणखी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

शेअर करा