मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Weather News : मुंबईसाठी 'यलो अलर्ट', या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Mumbai Weather Latest News : आठवड्याच्या अखेरीस देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

weather Update

Mumbai Weather Latest News : आठवड्याच्या अखेरीस देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या काळात कोकण विभागात तापमानात थोडीशी घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे आणि सोमवारी आकाश ढगाळ राहिले.

मुंबई :- आठवड्याच्या अखेरीस देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या काळात कोकण विभागात तापमानात थोडीशी घट नोंदवण्यात आली आहे. Mumbai Weather News दरम्यान, मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे आणि सोमवारी आकाश ढगाळ राहिले.आज म्हणजेच मंगळवार आणि बुधवारी वादळ येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईत दोन्ही दिवसांसाठी येल्लो अलर्ट इशारा जारी केला आहे आणि पुढील दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे.

या काळात मुंबई तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी रायगडमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बुधवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.मध्य महाराष्ट्रात बुधवारपर्यंत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ आहे. गुरुवारी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथे पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना येथे दोन दिवस आणि नांदेड, लातूर येथे बुधवार आणि गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेअर करा