मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police News : देवेन भारतींची 'सुपर 10' टीम पुन्हा मुंबईत! गुन्हेगारीविरोधात मुंबई पोलिसांची रणनीती सज्ज

•गुन्हे शाखेतील कसलेल्या 10 एसीपींचं पुनरागमन, मुंबईतील गुन्हेगारीला दणका देण्याची तयारी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police News : देवेन भारतींची 'सुपर 10' टीम पुन्हा मुंबईत! गुन्हेगारीविरोधात मुंबई पोलिसांची रणनीती सज्ज

•गुन्हे शाखेतील कसलेल्या 10 एसीपींचं पुनरागमन, मुंबईतील गुन्हेगारीला दणका देण्याची तयारी

मुंबई :- मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर वचक ठेवणारी, तपासात तरबेज अशी ‘क्राईम फोर्स’ पुन्हा मुंबईत दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, या दहा सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (एसीपी) याआधीही गुन्हे शाखेत ठसा उमटवलेला आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या ‘स्पेशल टीम’चा भाग असलेले हे अधिकारी आता पुन्हा मुंबई पोलिस दलात सक्रिय होणार आहेत.

या यादीत संजय डहाके, महेश मुगुटराव, अविनाश पालवे, ज्योत्स्ना रासम, सूर्यकांत बांगर, कल्पना गाडेकर, मृत्युंजय हिरेमठ, रेणका बुवा, शशिकांत माने आणि सुहास कांबळे यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक गाजलेल्या खटल्यांचा यशस्वी तपास केला असून त्यांचा अनुभव मुंबई पोलिस दलासाठी मोठी ताकद ठरणार आहे.

दरम्यान, सध्या मुंबईत कार्यरत एसीपी मनोज खंडाळे यांची बदली नाशिकच्या गुन्हे प्रकटीकरण प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली आहे. हे सर्व बदल्यांचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी अधिकृतपणे काढले.

महत्वाचं म्हणजे, गेल्या आठवड्यात राज्यातील 500 पेक्षा अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर, सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांमुळे पोलिस खात्यात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. निवडणुकीदरम्यान बाहेर गेलेले हे अधिकारी पुन्हा मैदानात उतरले असून, गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला नवी धार मिळणार हे निश्चित!

हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींना बावनकुळेंचं आकड्यांनी प्रत्युत्तर – “2009 ला 30 लाख मतदार वाढले, तेव्हा घोटाळा का झाला नाही?”

शेअर करा