मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबई : Police कॉन्स्टेबलची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर..

• Mumbai Police Constable Suicide News मुंबईतील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी पोलीस कॉन्स्टेबल ची आत्महत्या, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबई : Police कॉन्स्टेबलची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर..

•Mumbai Police Constable Suicide News मुंबईतील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी पोलीस कॉन्स्टेबल ची आत्महत्या, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती

मुंबई :- पोलीस विभागात गेले काही दिवसांपासून मानसिक तणावामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबल बाबत समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना सायन च्या प्रतीक्षा नगर मधून समोर आली आहे.विजय साळुंखे (38 वर्ष)असं या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. त्याने सायनमधील प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरात गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. Mumbai Police Constable Suicide News

विजय साळुंखे सायनच्या प्रतीक्षा नगर येथे राहत होते. ते शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 30 मे पासून पोलीस कॉन्स्टेबल रजेवर होते. मृत विजय साळुंखे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. मुंबईतील वडाळा टी टी पोलिसांनी विजय साळुंखे यांच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. Mumbai Police Constable Suicide News

हेही वाचा: Panvel News : बेथ एन प्रार्थनालय येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या दोघा जणांपैकी एकाला केले ठार तर एकाला घेतले ताब्यात

शेअर करा