मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : डिलिव्हरीसाठी निघालेला, मृत्यूला गाठलेला! महापालिकेच्या गाडीखाली चिरडून अजीमचा अंत

•अंधेरीच्या मध्यवर्ती चौकात भरधाव घनकचरा वाहनाची धडक; 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

•अंधेरीच्या मध्यवर्ती चौकात भरधाव घनकचरा वाहनाची धडक; 35 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

मुंबई :– शहरात घडलेली आणखी एक धक्कादायक घटना. फक्त काही क्षणांनी ग्राहकापर्यंत डिलिव्हरी पोहोचवणारा अजीम शेख (35 वय) आज घरीच परतला नाही. कारण, महापालिकेच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या घनकचरा वाहनाने त्याच्या आयुष्याची वाटच चिरडली.

बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजता अंधेरी पश्चिमेतील वालावलकर चौकाजवळील मस्जिद अल सलाम भागात ही दुर्घटना घडली. महापालिकेचे मिनी कॉपॅक्टर वाहन (MH 02 ER 5390) प्रचंड वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवर (MH 02 BX 7140) थेट आदळले.

या भीषण धडकेत अजीम गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अजीम हा गोरेगाव येथील रहिवासी असून, 'ब्लिंकीट'मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच वाहनचालक प्रकाश यादव (40 वय) याला ताब्यात घेतले. त्याच्यावर मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 106 आणि भारतीय न्याय संहिता कलम 281 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Navi Mumbai News : "नाईट लाइफ की आड, बारबालांची रासलीला!"

शेअर करा