मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Delhi news : डिलिमिटेशन विधेयकावरून पंतप्रधान मोदींचे सूचक ट्वीट; महिला आरक्षणावर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर निशाणाMumbai News : मविआत मोठी ठिणगी; ‘आम्ही त्या जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, संजय राऊतांचे खासदार अमोल कोल्हेंना थेट आव्हानMumbai News : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा दिलासा! PCMC ची ३७ वर्षांची कायदेशीर लढाई संपुष्टात; मालमत्ता करमाफी उच्च न्यायालयाकडून कायमदिलजीत दोसांझच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये ड्रग्जविरोधी पथकाची कारवाई; दोन जणांना ताब्यातMallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोपMumbai News : कामाठीपुरा पुनर्विकासाला सर्वपक्षीय नेत्यांचा हिरवा कंदील! राजकारण बाजूला ठेवून प्रकल्पाला गती देण्याचा निर्धार

Mumbai News : ‘हे पवारांचं जंतरमंतर आहे’; राष्ट्रवादीच्या संभाव्य भूमिकेवरून राज ठाकरेंचा खोचक टोला

Mumbai News : 2 जुलै 2023 च्या जुन्या पोस्टची आठवण करून देत निशाणा; तीन वर्षे दोन्ही राष्ट्रवादींनी भांडणाचं नाटक केल्याचा दावा, सत्तेसाठी दुसरी टीमही निघाल्याची टीका

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

‘हे पवारांचं जंतरमंतर आहे’
राष्ट्रवादीच्या संभाव्य भूमिकेवरून राज ठाकरेंचा खोचक टोला

Mumbai News : मुंबई :- मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांवर जोरदार निशाणा साधला आहे. “हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.

2 जुलै 2023 च्या पोस्टची आठवण; तीन वर्षे भांडणाच्या नाटकाचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टसोबत 2 जुलै 2023 रोजी केलेली जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला होता. त्या वेळी राज ठाकरे यांनी, “पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!” असे भाकीत केले होते. या जुन्या विधानाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचे नाटक केले आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीमही हलकारे देत निघाली आहे.

‘सिंहासन’ चित्रपटाच्या संदर्भाची आठवण; राजकीय वर्तुळात चर्चा

2 जुलै 2023 च्या मूळ पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी ‘सिंहासन’ चित्रपटातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’चा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे ओझे शरद पवारांना उतरवायचे होते व त्याचा पहिला अंक पार पडल्याची टीका केली होती. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाल्याचे आणि सत्तेच्या सिंहासनासाठी हे खेळ सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले होते. आता डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवार गटाच्या संभाव्य भूमिकेची चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांनी तीच पोस्ट पुढे करत पवारांच्या राजकारणावर ‘जंतरमंतर’ म्हणत टीकास्त्र सोडल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper