मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Local Stations Renaming : मुंबईच्या या आठ रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख, ब्रिटिशकालीन नावं बदलली

Mumbai's 8 Railway Stations Rename : शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Local Update
Mumbai Local

Mumbai's 8 Railway Stations Rename : शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

British-era Local Station Name Change In Mumbai :- महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ब्रिटीश काळात नाव देण्यात आलेल्या मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उत्तन (भाईंदर) आणि विरार (पालघर) दरम्यान सी लिंक बांधण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. Mumbai Local Stations Renaming

आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे.

  • 1- करी रोड स्टेशन- लालबाग स्टेशन
  • 2. मुंबई सेंट्रल- नाना जगन्नाथ शंकर सेठ स्टेशन
  • 3.भूसा रोड- डोंगरी स्टेशन
  • 4.मरीन लाईन्स- मुंबा देवी स्टेशन
  • 5.चर्नी रोड-गिरगाव स्टेशन
  • 6.कॉटन ग्रीन- काळाचौकी स्टेशन
  • 7.किंग सर्कल- तीर्थकर पार्श्वनाथ स्टेशन
  • 8.डॉकयार्ड स्टेशन- माझगाव स्टेशन
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.…
    किंग्ज सर्कल स्टेशनसह मुंबईतील सात उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलून तीर्थंकर पार्श्वनाथ करण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीनंतर मध्य मुंबईतील जैन समाजाने स्थानकाचे नामकरण पूज्य जैन तीर्थंकरांच्या नावावर करण्याच्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत.

    शेअर करा