मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Aditya Thackeray On Mumbai Hit And Run Case: आदित्य ठाकरे वरळीतील नाखवा परिवाराच्या घरी कुटुंबाचे सांत्वन, आदित्य ठाकरे समोर कुटुंबाने हंबरडा फोडला

V
Vivek

1 मिनिट वाचन

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Aditya Thackeray On Mumbai Hit And Run Case: आदित्य ठाकरे वरळीतील नाखवा परिवाराच्या घरी कुटुंबाचे सांत्वन, आदित्य ठाकरे समोर कुटुंबाने हंबरडा फोडला

मुंबई :- वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही कार शिवसेना नेत्याचा मुलगा मिहीर शहा (Mihir Shah) यांची होती. पोलिसांनी मिहीर शाहला अटक केली आहे. मिहीरला शिवडी न्यायालयात हजर केले असता बुधवारी त्याला 16 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ही घटना घडल्यानंतर आरोपींनी कारची नंबर प्लेट काढून फेकून दिल्याचे मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) म्हणणे आहे. ती नंबर प्लेट कुठे आहे ते शोधावे लागेल. Aditya Thackeray On Mumbai Hit And Run Case

आदित्य ठाकरे यांनी नाखवा कुटुंबाची घेतली भेट..!

शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. आदित्य ठाकरेंसोबत काँग्रेसचे नेते अस्लम शेख देखील उपस्थित होते.

आदित्य ठाकरे हे वरळी येथील नाखवा यांच्या घरी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी कुटंबीयांनी आदित्य ठाकरेंसमोर एकच हंबरडा फोडला. कावेरी नाखवा यांच्या आई म्हणाल्या की जे माझ्या मुलीसोबत केलं तेच त्यांच्यासोबत केलं पाहिजे, तेव्हा त्यांना वेदना कळतील. Aditya Thackeray On Mumbai Hit And Run Case

दादा.. त्यांना नाही सोडायचं… मुलीचा आक्रोश

रडता रडता ती आदित्य ठाकरेंना म्हणाली, दादा.. नाही सोडायचं त्यांना, ते सुटायला नको. यावेळी काही क्षण आदित्य ठाकरेंनाही भरुन आलं आणि ते म्हणाले, त्यांना सोडायचं नाहीच आहे, शिक्षाच द्यायची आहे, सगळ्यात कठोर शिक्षा आपण त्यांना देऊ.

शेअर करा