मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Cyber Fraud : सायबर गुन्ह्याचा विफल कट! 1930 हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे 1.29 कोटींचा आर्थिक अपघात टळला

73 वर्षीय डॉक्टरची 2.89 कोटींची फसवणूक; मुंबई सायबर पथकाची तातडीची कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vasai Latest Cyber Crime News

  • 73 वर्षीय डॉक्टरची 2.89 कोटींची फसवणूक; मुंबई सायबर पथकाची तातडीची कारवाई
  • मुंबई | शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरला व्हिडीओ कॉलवरून TRAI अधिकारी, पोलीस आणि न्यायाधीश असल्याचे भासवून तब्बल 2.89 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. परंतु 1930 सायबर हेल्पलाईनवरील तातडीच्या कारवाईमुळे या रकमेतील 1.29 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.

    विलेपार्ले येथे राहणाऱ्या 73 वर्षीय डॉक्टरला अज्ञात इसमांनी व्हिडीओ कॉलवरून संपर्क साधत, त्यांच्या बँक खात्यावर ‘अनियमित व्यवहार’ झाल्याचा बनाव उभा केला. नरेश गोयल प्रकरणात त्यांचे नाव असल्याचा खोटा आरोप करत त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देण्यात आली. दहशतीच्या वातावरणात त्यांच्याकडून 2.89 कोटी रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करून घेतले.

    दरम्यान, तक्रार मिळताच 1930 हेल्पलाईनवरील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर व त्यांच्या पथकाने NCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सुमारे 1.29 कोटी रुपयांवर त्वरित होल्ड आणण्यात यश मिळवले.

    ही कारवाई सायबर गुन्हेगारीविरोधातील लढ्यात 1930 हेल्पलाईनची कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. नागरिकांनी अशा फसवणूक प्रकरणांमध्ये तत्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    ही कारवाई देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्णा शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम प्राभारी सायबर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर यांच्या 1930 हेल्पलाईन पथकाने पार पाडली आहे.

    हेही वाचा: Mumbai Share Market Scam : शेअर मार्केटच्या लोभात 1.5 कोटींची सायबर फसवणूक, बनावट ॲपने फसवले लोअर परळच्या उच्चपदस्थ व्यक्तीला

    शेअर करा