मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : वृद्धाला 'रियाल'चे आमिष दाखवून 2 लाखांना फसवले! - सौदी चलनाऐवजी कागदी बंडल; मुंबई गुन्हे शाखेने तिन्ही सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

•स्वस्तात पाच लाखांचे चलन देण्याचे खोटे आश्वासन; कुर्ल्यात व्यवहारानंतर अब्बास अली यांची फसवणूक; सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जेरबंद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News : वृद्धाला 'रियाल'चे आमिष दाखवून 2 लाखांना फसवले! - सौदी चलनाऐवजी कागदी बंडल; मुंबई गुन्हे शाखेने तिन्ही सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

•स्वस्तात पाच लाखांचे चलन देण्याचे खोटे आश्वासन; कुर्ल्यात व्यवहारानंतर अब्बास अली यांची फसवणूक; सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी जेरबंद

मुंबई :- सौदी अरेबियाचे चलन असलेल्या 'रियाल'च्या बदल्यात कागदी बंडल देऊन, एका 76 वर्षीय वृद्धाकडून दोन लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना मुंबई गुन्हे शाखेच्या परिमंडळ-3 च्या पथकाने अटक केली आहे.

भायखळा परिसरात राहणारे तक्रारदार अब्बास अली (वय 76) यांना काही दिवसांपूर्वी एका आरोपीने भेटून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सौदी अरेबियाचे रियाल चलन असून ते कमी किमतीत विकायचे असल्याचे सांगितले. पाच लाख रुपयांचे रियाल केवळ दोन लाख रुपयांना विकण्यास तो तयार झाल्याने अली यांनी त्वरित होकार दिला.

ठरल्या वेळेनुसार अब्बास अली दोन लाख रुपये घेऊन कुर्ला येथे आले. आरोपीने त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कथित रियालची पिशवी दिली आणि लगेच घटनास्थळावरून पोबारा केला. अली यांनी पिशवी उघडून पाहताच, त्यात चलनाच्या ऐवजी केवळ कागदी बंडल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी या प्रकरणी उस्मान अस्लम (वय 32), हसन शेख (वय 26) आणि रहीम खान (वय 36) या तिघांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! - उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ

शेअर करा