मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! - उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ

•खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ईडीचे पथक दाखल; कारखान्यातील कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uday Samant : रत्नागिरीत उद्योजकाच्या कात कारखान्यावर ईडीची छापेमारी! - उद्योगमंत्री उदय सामंतांच्या निकटवर्तीयावर सकाळीच मोठी कारवाई, जिल्ह्यात खळबळ

•खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे ईडीचे पथक दाखल; कारखान्यातील कागदपत्रे आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू, राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे गुरुवारी (11 डिसेंबर) सकाळी कात उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर ईडीकडून (ED) छापेमारी करण्यात आली आहे. नामवंत उद्योजक सचिन पाकळे यांच्या कारखान्यावर ही अचानक धाड टाकल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

उद्योगमंत्र्यांचे निकटवर्तीय

सचिन पाकळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत उद्योजक असून त्यांचा राजकीय वावरही मोठा आहे. ते राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि आमदार शेखर निकम यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यामुळे या धाडीने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

छापेमारीची प्रक्रिया

चिपळूण सावर्डे येथे सकाळी आठ वाजताच ईडीचे अधिकारी मोठ्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी कारखान्यातील कागदपत्रे, व्यवहार आणि आर्थिक नोंदींची तपासणी सुरू केली आहे. संपूर्ण कारवाईदरम्यान कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे, त्यामुळे धाड कोणत्या प्रकरणात करण्यात आली किंवा नेमका कोणता आर्थिक गैरव्यवहार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. परिसरात पोलिसांचा मोठा वावर असल्याने खेडसह संपूर्ण जिल्ह्यात या धाडीची जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: Thane News : 'गुन्हा कबूल नाही!' - रेल्वे भरती बोर्ड मारहाण प्रकरणी राज ठाकरे ठाणे कोर्टात हजर, न्यायालयाने दिली 'एक महिन्याची डेडलाईन'

शेअर करा