मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : 40 बारबालांचा नाच… आणि पोलिस निरीक्षक थेट निलंबित!

• नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या बारवर छापा; एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलंबित; विभागीय चौकशीचा फड उघडला!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Dance Bar raid

•नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या बारवर छापा; एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलंबित; विभागीय चौकशीचा फड उघडला!

मुंबई | अंधेरी एमआयडीसीतील एका हायप्रोफाईल बारमध्ये तब्बल 40 बारबाला अश्लील नृत्य करताना पकडल्या गेल्याने खळबळ उडाली आहे. परंतु या पेक्षा मोठा धक्का म्हणजे, या सगळ्यावर कानाडोळा करणाऱ्या पोलीस निरीक्षकावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे!

गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने बारवर धाड टाकली आणि त्यात नियमांचं तीन तेरा वाजलेलं आढळून आलं – कोणताही परवाना न घेता नृत्य सुरू, मद्यपान खुलेआम, आणि पोलिस प्रशासन ‘मौन’!

या प्रकरणात हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही, तर विभागीय चौकशीसह कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

पोलीस विभागात याआधी अशा घटना झाल्यानंतर केवळ बदलीचा फार्स रंगत असे. पण यावेळी सरळ निलंबन करून ‘संदेश’ देण्यात आला आहे — कायदा तोडणाऱ्यांना माफ नाही, आणि डोळेझाक करणाऱ्यांना तर अजिबातच नाही!

एक गोष्ट निश्चित — एमआयडीसीत नियमांची खेळच सुरू होती, पण आता पोलिस विभागात खळबळ माजली आहे!

हेही वाचा: Ratlam Express Raid : रतलाम एक्स्प्रेसवर छापा! ताडदेव पोलिसांनी ‘लाईव्ह ऑपरेशन’मध्ये पकडले सोन्या-चांदीचे लुटेरे!

शेअर करा