मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mulshi News : ‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला मुळशीकरांचा विरोध

Mulshi News :मुळशी : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न २’ या चित्रपटाच्या नावावरून आता मुळशी तालुक्यात विरोधाचे वातावरण निर्माण झाले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला मुळशीकरांचा विरोध नाव बदलण्याची मागणी; तरुणांना नोकरी, विवाहाच्या संधींमध्ये अडचणी येत असल्याचा दावा
‘मुळशी पॅटर्न २’च्या नावाला मुळशीकरांचा विरोध नाव बदलण्याची मागणी; तरुणांना नोकरी, विवाहाच्या संधींमध्ये अडचणी येत असल्याचा दावा

Mulshi News : नाव बदलण्याची मागणी; तरुणांना नोकरी, विवाहाच्या संधींमध्ये अडचणी येत असल्याचा दावा

Mulshi News :मुळशी : दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न २’ या चित्रपटाच्या नावावरून आता मुळशी तालुक्यात विरोधाचे वातावरण निर्माण झाले आहे. चित्रपटाच्या नावामुळे संपूर्ण मुळशी तालुक्याची ओळख गुन्हेगारीशी जोडली जात असल्याचा आरोप मुळशीकरांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावाचा पुनर्विचार करून मुळशी तालुक्याची बदनामी थांबवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.https://maharashtramirror.com/ Mulshi News

‘मुळशी पॅटर्न’ या नावामुळे मुळशीची एक विशिष्ट आणि नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली असून त्याचा परिणाम तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांवर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः मुळशीतील तरुणांना या प्रतिमेचा फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Mulshi News

मुळशी तालुक्यातील तरुण-तरुणींना नोकरीच्या संधी मिळताना तसेच विवाह जुळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. मुळशीतील प्रत्येक व्यक्तीचा गुन्हेगारीशी संबंध असल्याचा चुकीचा समज समाजात निर्माण होत असल्याने त्याचा थेट परिणाम तरुणांच्या भवितव्यावर होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Mulshi News

मुळशी तालुका केवळ गुन्हेगारीसाठी नव्हे, तर निसर्ग, शेती, पर्यटन, शिक्षण आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्वासाठीही ओळखला जातो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावामुळे संपूर्ण तालुक्याला एका नकारात्मक चौकटीत बसवणे योग्य नसल्याची भूमिका मुळशीकरांनी घेतली आहे.https://maharashtramirror.com/ Mulshi News

दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न २’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरत असतानाच त्याच्या नावावरून निर्माण झालेला हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

शेअर करा