मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : पाच लाख की पन्नास लाख?तपासासमोर मोठा प्रश्न

Mumbai News : मुंबई : एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पाच लाख की पन्नास लाख? तपासासमोर मोठा प्रश्न
पाच लाख की पन्नास लाख? तपासासमोर मोठा प्रश्न

Mumbai News : मुंबई : एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाची चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न बाहेर आल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आतापर्यंतच्या तपासात प्रश्न मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता ऋतुजा पाटीलच्या कथित व्हॉट्सअॅप संभाषणातील माहितीमुळे पेपरफुटीच्या व्यवहाराची व्याप्ती अधिक मोठी असल्याचा संशय निर्माण झाला आहे. ऋतुजाने मैत्रिणीसोबत केलेल्या संभाषणात औषध निरीक्षक पदाचा पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा केल्याचे सांगितले जात आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
जर हा दावा तपासात खरा ठरला, तर आतापर्यंत समोर आलेल्या 5 लाख किंवा 12 लाख रुपयांच्या व्यवहारापेक्षा या प्रकरणातील आर्थिक व्यवहार कितीतरी मोठा असल्याचे स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे ५० लाख रुपये नेमके कुणाला देण्यात आले, त्यातील किती रक्कम पुढे पोहोचली आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग होता, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News
12 लाख रुपयांत 77 प्रश्न मिळाल्याचा तपास
या प्रकरणात ऋतुजा पाटील हिला परीक्षेपूर्वी 77 प्रश्न मिळाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तिचे वडील अमृत पाटील यांनी या प्रश्नांसाठी १२ लाख रुपये दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, ऋतुजाच्या लग्नासाठी जमवलेली रक्कम तिच्या औषध निरीक्षक होण्यासाठी वापरण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. ऋतुजाला मिळालेल्या प्रश्नांपैकी मोठ्या संख्येने प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा तपास यंत्रणेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेची गोपनीयता नेमकी कुठे भंग झाली आणि एमपीएससीच्या यंत्रणेतील कोणत्या स्तरावरून प्रश्न बाहेर गेले, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे. https://maharashtramirror.com/ Mumbai News

संशय येऊ नये म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडव
या प्रकरणातील कथित व्हॉट्सअप संभाषणातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतुजाला प्रश्नांचा संच दिल्यानंतर त्यातील काही प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवण्याचा सल्ला देण्यात आला, जेणेकरून तिच्यावर संशय येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. ऋतुजाने संभाषणात तिला मिळालेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न परीक्षेत आल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिने मिळालेल्या प्रश्नांपैकी 78 प्रश्नांची उत्तरे खात्रीने सोडवल्याचा उल्लेख संभाषणात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नसंच केवळ एका उमेदवारापर्यंतच मर्यादित होता का, की तो अनेक उमेदवारांना पुरवण्यात आला होता, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

12 लाखांच्या व्यवहारात मयूर ठाकरेचा दुवा?
या प्रकरणातील आर्थिक व्यवहाराचा तपास करताना मयूर ठाकरे हे नावही समोर आल्याचे सांगितले जात आहे. अमृत पाटील आणि प्रवीण पाटील यांच्यातील संपर्काचा दुवा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपासानुसार अमृत पाटील यांनी प्रवीण पाटीलकडे पैसे दिले आणि ते पुढे एमपीएससीशी संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे पैशांचा संपूर्ण प्रवास शोधणे हे तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.

शेअर करा