मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS - Shivsena Alliance : शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेने रंगणार मुंबईचा रणसंग्राम?

•माजी नगरसेवकांचा युतीला पाठिंबा; ठाकरे म्हणाले, "सर्वांचा विश्वास घेऊनच निर्णय!"

V
Vivek

1 मिनिट वाचन

MNS - Shivsena Alliance : शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेने रंगणार मुंबईचा रणसंग्राम?

•माजी नगरसेवकांचा युतीला पाठिंबा; ठाकरे म्हणाले, "सर्वांचा विश्वास घेऊनच निर्णय!"

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसे युतीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती केल्यास फायदा होईल, असा सूर स्पष्टपणे लावला असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय हा "सर्वांना विश्वासात घेऊनच" होईल, असा पुनरुच्चार करत राजकारणातले समतोल साधला आहे.

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. मनसेसोबत युतीचा मुद्दा चर्चेत आला आणि अनेक माजी नगरसेवकांनी या युतीस अनुकूलता दर्शवली. यावर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील एकी आणि सल्लामसलतीला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.

निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता असून शिवसेना भवनात विशेष निवडणूक कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, "शिवसेना भवन हे जनतेच्या प्रश्नांचं केंद्र बनवा आणि या निवडणुकीत भगवा पुन्हा फडकवा!"

दरम्यान, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे मनसे-भाजप समीकरणावर नवे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे युती झाली, तर मुंबईतील राजकीय गणितं पूर्णपणे बदलण्याची चिन्हं आहेत.

हेही वाचा: Mumbai Crime News : विमा हप्त्यावर सवलतीचे आमिष… व्यावसायिकाची दोन लाखांची फसवणूक!

शेअर करा