मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

MNS Candidate List : राज ठाकरे यांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची नावे जाहीर

•Raj Thackeray Party MNS 3rd Candidate List महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

MNS Candidate List : राज ठाकरे यांच्या पक्षाची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची नावे जाहीर

•Raj Thackeray Party MNS 3rd Candidate List महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 13 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पक्ष नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतील 13 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.

मनसेच्या तिसऱ्या यादीत अमरावतीमधून पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, नाशिक पश्चिममधून दिनकर धर्माजी पाटील, अहमदपूर-चाकूरमधून नरसिंग भिकाणे, परळीतून अभिजित देशमुख, विक्रमगडमधून सचिन रामू शिंगडा, भिवंडीतून वनिता शशिकांत कथुरे,यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमधून नरेश कोरडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच मनसेने शहादामधून आत्माराम प्रधान, वडाळ्यातून स्नेहल सुधीर जाधव, कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी 16 जागा मुंबईत आहेत. या यादीत पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

हेही वाचा: Zishan Siddiqui : वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवार उभे केल्यानंतर आमदार जीशान सिद्दीकी महाविकास आघाडीवर नाराज!

शेअर करा