मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Cyber Crime News : सायबर ठगांचा गेम ओव्हर! मिरा रोड पोलिसांची भन्नाट कामगिरी, 1.5 लाखांचा ऑनलाईन घोटाळा 72 तासांत परत!

•फसवणुकीचा शिकार झालेल्या महिलेला दिला दिलासा, सायबर पोलिसांनी केली आर्थिक सुटका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Crime: Cyber ​​fraud exposed in 17 days! Navi Mumbai Police's big achievement

•फसवणुकीचा शिकार झालेल्या महिलेला दिला दिलासा, सायबर पोलिसांनी केली आर्थिक सुटका

मिरा रोड :- ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यावर बहुतांश नागरिक हार मानतात, पण मिरा-भाईंदर सायबर पोलिसांनी एका महिलेला 1.50 लाख रुपयांची रक्कम पुन्हा मिळवून देत धाडसी आणि तत्परतेचा उत्तम दाखला दिला आहे.

तक्रारदार इरनाक यांनी सोशल मीडियावर एका वेबसाईटवर मोबाईल फोनच्या कमी किमतीतील जाहिरात पाहून खरेदीचा निर्णय घेतला. त्यांनी सदर वेबसाईटवरून 1.50 लाख रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र मोबाईल वेळेत न पोहोचल्याने फसवणुकीची जाणीव झाली.

त्यानंतर त्यांनी मिरा रोड सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोर्टलवर नोंद घेतल्यावर, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ऑनलाईन व्यवहाराच्या तांत्रिक तपासणीत फसवणूक झालेली रक्कम एका ई-कॉमर्स खात्यात वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि त्यांच्या पथकाने संबधित ई-कॉमर्स कंपनीसोबत पत्रव्यवहार करून रक्कम रोखण्यात यश मिळवले. अखेर तक्रारदाराच्या मूळ बँक खात्यात 1.5 लाख रुपये परत जमा करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी स्वप्नील वाव्हळ, प्रसाद शेनोळकर, वैभव धनवडे, अमिना पठाण, स्नेहल पुणे, कुणाल सावळे, माधुरी धिंडे आणि सायन शेवाळे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

हेही वाचा: Vijay Wadettiwar : "ना हनी, ना ट्रॅप – पण सत्तेचा हादरा झालाच!" : हनी ट्रॅपवरून विधानसभेत आरोप-प्रत्यारोप

शेअर करा