मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vijay Wadettiwar : "ना हनी, ना ट्रॅप – पण सत्तेचा हादरा झालाच!" : हनी ट्रॅपवरून विधानसभेत आरोप-प्रत्यारोप

• “हातात सीडी आहे, पण दाखवण्यासाठी तिकीट लावावं लागेल!” – विजय वडेट्टीवारांचा दावा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vijay Wadettiwar

• “हातात सीडी आहे, पण दाखवण्यासाठी तिकीट लावावं लागेल!” – विजय वडेट्टीवारांचा दावा

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरणाने राजकारणाचा पारा गाठला असून, सत्ताधारी व विरोधकांमध्ये तुफान आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका बाजूला सरकारकडून "या प्रकरणात काहीच नाही" असं ठसठशीत स्पष्टीकरण देण्यात आलं असतानाच, विरोधी पक्ष नेत्यांच्या दाव्यांमुळे ही आग चांगलीच भडकली आहे.

"ना हनी आहे, ना ट्रॅप," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले. पण विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य नव्याने अधोरेखित झालं. "आमच्याकडे सीडी आहे, पण ती दाखवायला दहा-वीस हजारांचं तिकीट लावावं लागेल, आणि फक्त खास निमंत्रितांनाच दाखवता येईल," असा धक्कादायक दावा वडेट्टीवारांनी केला.

त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेन ड्राईव्ह विधानसभेत दाखवल्याचं सांगत, "मी ते अध्यक्षांना देणारच होतो, पण त्यांनी थांबवलं. त्यावेळी मागितलं असतं तर दिलं असतं. पण त्या माहितीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात, म्हणून आम्ही संयम पाळतोय," असं सांगितलं.

पटोले यांनी थेट मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप करत, "मुख्यमंत्र्यांना एका आईचे अश्रू समजत नाहीत. मग त्यांनी सभागृहात केलेलं विधान खोटं होतं का?" असा रोखठोक सवाल केला. त्यांनी नाशिक, ठाणे, मुंबई ही हनी ट्रॅपची केंद्रं असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

“या हनी ट्रॅपमुळे राज्यातील महत्त्वाचे दस्तऐवज असामाजिक शक्तींच्या हाती गेलेत. त्यामुळे महाराष्ट्र धोक्यात आहे. पण सरकार लपवाछपवी करतेय,” असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: Nitesh Rane : "खरा विलन ओळखा… शकुनी मामा मातोश्रीवरच बसलाय!" – नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर रोखठोक हल्ला

शेअर करा