मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाइन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌ ,"Work From home"नावाखाली फसवणूक

• Mira Road Online Work From Home Fraud काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम महिलेला परत मिळवून देण्यास यश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Crime News : युट्युब व्हिडिओ लाईक, ऑनलाइन हॉटेल मूव्ही रेटिंग टास्क‌ ,"Work From home"नावाखाली फसवणूक

•Mira Road Online Work From Home Fraud काशिगांव पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील रक्कम महिलेला परत मिळवून देण्यास यश

मिरा रोड :- सायबर भामट्यांकडून सावधान रहा अन्यथा वर्कशॉप होम च्या नावाखाली तुमची ही होऊ शकते फसवणूक! वर्क फ्रॉम च्या नावाखाली एका महिलेचे एक लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. youtube ऑनलाइन लाईक स्टास्क, ऑनलाइन हॉटेल मुव्ही रेटिंग यांना लाईक करण्याचे काम देण्यात आले होते. तसेच सायबर भुरट्यांनी त्या महिलेला हे टास्क पूर्ण केल्यास तसेच त्यामध्ये पैसे गुंतवल्यास अधिकचा नफा मिळेल असे अमिष दाखवून महिलेची एक लाख 7 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमन कलम 66 (सी) 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोशनी किवकुमार कनोजिया (30 वर्ष, रा.मिरा रोड) या महिलेने काशिमिरा पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. महिलेने केलेला तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी काशिगाव पोलिसांच्या सायबर विभागाने तपास करत महिलेने केलेल्या व्यवहारा संदर्भात वेगवेगळ्या बँक खात्यावर वळती केल्याचे दिसून आले. पोलीस यांनी त्वरित संबंधित बँकेसोबत पत्रव्यवहार करून सदर रक्कम गोठविण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासोबत पत्रव्यवहार करून काशिगांव पोलिसांच्या सायबर विभागाने फसवणुकीतील एक लाख 7 हजार रुपये रोशनी कनोजिया या महिलेच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.

पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मिरारोड, विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल सोनवणे, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.

हेही वाचा: Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा "लाडका मंत्री"योजनेचा आणखी एक लाभार्थी ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट

शेअर करा