मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

सिंहगड रोड परिसरात शस्त्रास्त्रांचा साठा बाळगणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना तो एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्री पटली

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

सिंहगड रोड परिसरात शस्त्रास्त्रांचा साठा बाळगणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना तो एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्री पटली

पुणे: वडगाव बुद्रुक परिसरात उघडपणे कोयता घेऊन फिरणाऱ्या आणि कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या एका विधीसंघर्षित बालकाला सिंहगड रोड पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून केवळ कोयता नव्हे, तर तलवार, चायनीज चॉपर आणि इतर धारदार लोखंडी हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २०) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार तानाजी सागर आणि समीर माळवदकर यांना एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. “वडगाव बुद्रुक येथील तुकाईमाता रिक्षा स्टँडजवळ कालव्याच्या कडेला एक मुलगा लोखंडी हत्यार घेऊन थांबला आहे,” अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांना कल्पना देऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथक परिसरात पोहोचताच, तेथे थांबलेल्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नांना त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांना तो एखादा मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची खात्री पटली. दोन पंचांच्या समक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता सापडला. अधिक तपासासाठी त्याच्या घराची झडती घेतली असता, तेथे लोखंडी कोयते, दोन धारदार हत्यारे, एक लोखंडी तलवार आणि एक चायनीज चॉपर असा एकूण २ हजार ६०० रुपयांचा शस्त्रसाठा सापडला.

सिंहगड रोड पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Minor boy arrested for possessing weapons in Sinhagad Road area

शेअर करा