MHT-CET : भाजप नगरसेवकाच्या जुळ्या मुलांना ९९ टक्के, चौकशीची मागणी
महाराष्ट्र मिरर
2 मिनिट वाचन

MHT-CET निकालावरून नांदेडमध्ये राजकीय रणकंदन
महाराष्ट्र मिरर
MHT-CET २०२६ च्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांच्या निकालावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. बारावी आणि जेईई (JEE) परीक्षांच्या तुलनेत CET मध्ये अवाच्या सव्वा गुण मिळाल्याचा दावा करत, या निकालात मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर संशय काँग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशीची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. MHT-CET cet result controversy bjp sons
नेमका वाद काय?
कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची पोलखोल करताना सांगितले की, भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना (मुगा आणि मुलगी) MHT-CET परीक्षेत घवघवीत यश मिळवत अनुक्रमे ९९ पर्सेंटाइल मिळाले आहेत. मात्र, त्यांच्याच शैक्षणिक पात्रतेचा लेखाजोखा मांडताना काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहेत .

PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) गटात या मुलांना अनुक्रमे केवळ ५६ टक्के आणि ५१ टक्के गुण मिळाले होते. राष्ट्रीय पातळीवरील जेईई (JEE) परीक्षेत त्यांना अनुक्रमे ५१ आणि २८ पर्सेंटाइल मिळाले होते. ज्या विद्यार्थ्यांना बारावी आणि जेईईमध्ये जेमतेम गुण मिळाले, त्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) मध्ये थेट ९९ पर्सेंटाइल कसे काय मिळू शकतात? असा थेट सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. MHT-CET
या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. दरम्यान भाजप नेत्याने आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
Pune News : बांधकाम व्यावसायिकाची ११.२८ कोटी रुपयांची फसवणूक
काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत भाजप नगरसेवक आशिष नेरळकर यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मुलांवर विनाकारण राजकीय रोषातून लांछन लावले जात आहे. आपल्या भूमिकेचा बचाव करताना नेरळकर म्हणाले, आमच्या दोन्ही मुलांचे सुरुवातीपासूनच मुख्य ध्येय MHT-CET परीक्षा हेच होते. त्यांनी पूर्ण लक्ष केवळ CET च्या तयारीवर केंद्रित केले होते. बारावी बोर्डाच्या अभ्यासपद्धतीचे गुण आणि CET च्या गुणांचा थेट संबंध जोडणे चुकीचे आहे. CET च्या तयारीमुळेच त्यांनी बोर्डापेक्षा स्पर्धात्मक अभ्यासावर अधिक भर दिला.
Pune Crime: आंदेकर टोळीतील गुंडांचा एसटी बॉईज टोळीकडून पाठलाग; कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तणाव
आमच्या मुलांनी अत्यंत प्रामाणिकपणे परीक्षा दिली असून कुठलाही पेपर फुटलेला नाही किंवा गैरप्रकार झालेला नाही. प्रशासनाने हवी ती सखोल चौकशी करावी, आम्हाला कशाचीही भीती नाही," असे नेरळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच, या आरोपांमुळे त्यांच्या दोन्ही मुलांवर प्रचंड मानसिक तणाव ओढवला असून, राजकीय फायद्यासाठी अल्पवयीन मुलांना व कुटुंबाला टार्गेट केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. MHT-CET
राजकीय वातावरण तापले
या प्रकरणामुळे नांदेडच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार आणि चौकशीची मागणी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. MHT-CET




