मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mhada News | साऊथ मुंबई सेंट्रलचा चेहरामोहरा बदलणार ! जपानचा विकास मॉडेल मुंबईत अंमलात येणार, म्हाडा आणि जपानच्या युआर संस्थेत मोठी बोलणी

मुंबई, महाराष्ट्र मिरर: Mhada News | मुंबईतील जुन्या इमारती, दाट वस्त्या आणि गुंतागुंतीच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आता जपानच्या शहरी पुनर्विकासाच्या अनुभवाची मदत घेतली जाणार आहे.

M
mubarak

3 मिनिट वाचन

mhada news

म्हाडा आणि जपानमध्ये सामंजस्य कराराची तयारी; कामाठीपुरासारख्या जुन्या आणि दाट वस्तीच्या क्लस्टर पुनर्विकासासाठी जपानी अनुभवाचा उपयोग | Mhada News

मुंबई, महाराष्ट्र मिरर: Mhada News | मुंबईतील जुन्या इमारती, दाट वस्त्या आणि गुंतागुंतीच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आता जपानच्या शहरी पुनर्विकासाच्या अनुभवाची मदत घेतली जाणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि जपानमधील संबंधित शहरी विकास संस्थेदरम्यान सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या माध्यमातून मुंबईच्या पुनर्विकासासाठी ‘जपान मॉडेल’चा अभ्यास केला जाणार आहे, यामुळे साऊथ मुंबई सेंट्रलचा चेहरामोहरा बदलणार आहे. Mhada News , Maharashtra Mirror

म्हाडा आणि जपानच्या ‘अर्बन रेनेसाँ एजन्सी’ (यूआर) यांच्यात मुंबईतील शहरी पुनर्विकास, शहरी पुनरुत्थान आणि गृहनिर्माणाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि जपानी शिष्टमंडळाची याबाबत चर्चा येथे झाली.

mhada news

‘महाराष्ट्र मिरर’शी बोलताना संजीव जयस्वाल यांनी या प्रस्तावित सहकार्याची माहिती दिली. मुंबईतील पुनर्विकासाचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आहे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती, कमी जागेत मोठी लोकसंख्या, पायाभूत सुविधांवरील ताण आणि पुनर्विकास प्रक्रियेतील विविध अडचणी लक्षात घेता जपानमध्ये राबविण्यात आलेल्या शहरी पुनरुत्थानाच्या पद्धतींचा मुंबईला फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

यासंबंधी अधिक माहिती देताना संजीव जयस्वाल म्हणाले, "हा फक्त कामाठीपुराचा पुनर्विकास नाही. त्याभागावर आपण भर देत आहोत. कामाठीपुराचा पुनर्विकास हा आव्हानात्मक आहे. त्यासाठी आपण जपानी सरकारच्या प्रतिष्ठित 'अर्बन रेनेसाँ एजन्सी’ (यूआर) या कंपनीच्या अनुभवाची मदत घेणार आहोत. मुंबईमधील दहा ते बारा क्लस्टर्स आपण हाती घेतले आहेत. त्यांचा विकास हा वेगवेगळ्या स्तरावर आहे. काहींच्या निविदा दिल्या आहेत तर काहींची ऑफर लेटर दिली आहेत."

ते म्हणाले, "मुंबईतील ९०० ते १,००० एकर जमीन ही पुनर्विकासात जाणार आहे. पहिल्यांदा आपला मूळ हेतू हा आहे की येथील स्थानिक लोक आहेत त्यांचे पुनर्वसन करणे. यापूर्वीही या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 'युआर'चे अध्यक्ष मसारु इशिदा यांच्यात बोलणी झाली आहेत व काही बैठका झाल्या आहेत. आता 'युआर'चे प्रकल्प संचालक हिदुकी इगुची, त्यांचे ग्लोबल अफेअर्स विभागाचे संचालक नाकाकुरी ओकि आणि शहरी पुनरुज्जीवन आणि गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ प्रकल्प अधिकारी विझूबो कारुको यांच्या नेतृत्वाखाली जपानी शिष्टमंडळाशी आमची चर्चा झाली. त्यांच्याबरोबर ज्ञानाची देवाणघेवाण आणि त्यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनात आणखी चांगले करता येईल या अनुषंगाने आपण एमओयू करत आहोत."

ते पुढे म्हणाले, "त्यासाठी मसुदा तयार केला आहे. त्यावर ते त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. त्यांच्या गव्हर्निंग कॉउंसिलने तो मंजूर केल्यावर साधारण पुढच्या महिन्यात करारावर सह्या होतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेतल्यानंतर रीतसर निविदा प्रक्रिया पूर्ण करून एजेन्सी नेमून त्यांचा सल्ला कितपत आपण राबवू शकतो याचा विचार करू. हे खूप मोठे काम असल्याने त्याविषयी आम्ही चर्चा करून मसुदा बनवलेला आहे."

जयस्वाल म्हणाले, "जपानने त्यांच्या दाट लोकवस्तीच्या शहरांचा पुनर्विकास केला तसाच मुंबईचा होईल असे नाही. त्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक घटकसुद्धा आपल्याला तपासावे लागतील. आपल्या येथील आव्हाने वेगळी आहेत. त्यांचे आणि आपले तज्ज्ञ मिळून त्यांना सामोरे कसे जायचे ते ठरवतील. यातून आपला फायदा किती होईल हे आज सांगणे कठीण आहे. परंतु त्यातून नुकसान काहीच होणार नाही. आपला पुनर्वसनाचा मूळ हेतू नक्की साध्य होईल."

या सहकार्यामध्ये केवळ नव्या इमारती उभारण्याऐवजी संपूर्ण परिसराच्या नियोजनावर भर दिला जाणार आहे. गृहनिर्माणासोबत रस्ते, मोकळ्या जागा, नागरी सुविधा आणि रहिवाशांच्या गरजा यांचा विचार करून पुनर्विकास कसा करता येईल, यासाठी जपानी अनुभवाचा अभ्यास केला जाणार आहे.

विशेषतः कामाठीपुरासारख्या जुन्या आणि दाट वस्तीच्या भागातील क्लस्टर पुनर्विकासासाठी हे सहकार्य महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. अशा भागांमध्ये जमीन मालकीचे गुंतागुंतीचे स्वरूप, जुन्या इमारतींची मोठी संख्या आणि स्थानिक रहिवाशांचे पुनर्वसन ही मोठी आव्हाने आहेत. जपानमध्ये अशाच स्वरूपाच्या शहरी भागांचे टप्प्याटप्प्याने पुनरुत्थान करण्यात आले असून, तेथील नियोजन आणि प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव मुंबईसाठी उपयोगी ठरू शकतो.

जपानी शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत मुंबईतील गृहनिर्माण आणि पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर विचारविनिमय करण्यात आला. तांत्रिक ज्ञान, प्रकल्प राबविण्याच्या पद्धती आणि शहरी पुनरुत्थानातील अनुभव यांची देवाणघेवाण करण्यावर भर देण्यात आला.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले जात असताना म्हाडा-जपान सहकार्यामुळे नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन शहरी विकासासाठी नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा