मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

"राहुल गांधींना भेटून दाखवा!" – तांबे यांचे काँग्रेस नेत्यांना थेट आव्हान; थोरातांचा जळजळीत प्रतिउत्तर

सत्यजित तांबे यांची काँग्रेसवर घणाघाती टीका; थोरात म्हणाले, “बालिशपणा थांबवा, ऋण विसरू नका”

V
Vivek

1 मिनिट वाचन

"राहुल गांधींना भेटून दाखवा!" – तांबे यांचे काँग्रेस नेत्यांना थेट आव्हान; थोरातांचा जळजळीत प्रतिउत्तर

सत्यजित तांबे यांची काँग्रेसवर घणाघाती टीका; थोरात म्हणाले, “बालिशपणा थांबवा, ऋण विसरू नका”

मुंबई | राजकीय चर्चांना हवा देणारे वक्तव्य करत आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस नेत्यांना थेट उघड आव्हान दिलं आहे. “महाराष्ट्रातील काँग्रेसचे कुणीही नेते एका तासात राहुल गांधींना भेटून दाखवा!” असे तांबे म्हणाले, आणि लगेचच या विधानाने काँग्रेसमध्ये खळबळ उडवली. त्याचबरोबर काँग्रेसच्या धोरणांवरही त्यांनी सडकून टीका केली.

तांबे यांच्या या टीकेमुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली असून, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या विधानांना "बालिश" ठरवत परखड शब्दांत उत्तर दिलं. “तुमचं वय आता युवक काँग्रेसचं राहिलेलं नाही. काय, कुठे आणि कसं बोलायचं हे शिकायला हवं. राहुल गांधी आणि काँग्रेसबद्दल अशा प्रकारचं बोलणं म्हणजे कृतघ्नपणा,” असे थोरात म्हणाले.

थोरातांचे प्रत्युत्तर:
“काँग्रेसने सत्यजित तांबे यांना घडवलं. पक्षाने दिलेलं योगदान विसरणं हे लाजीरवाणं आहे. थोडं आत्मचिंतन करावं लागेल,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं. “तुम्हाला आता मोकळं वावरण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की ज्या पक्षाने उभं केलं त्याच्यावर टीका करावी,” असे थोरात म्हणाले.

तांबे यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, पक्ष नेतृत्वाने लवकरच यावर कठोर भूमिका घेण्याचे संकेतही मिळत आहेत.

हेही वाचा: Maharashtra Politics : मुख्यमंत्री व विरोधी नेते एकाच शहरात; बडगुजर-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण

शेअर करा