मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पिंपळे सौदागर येथील टेस्ट ऑफ इंदौरच्या कारखान्याला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा होता

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

पिंपळे सौदागर येथील टेस्ट ऑफ इंदौरच्या कारखान्याला भीषण आग; मोठी दुर्घटना टळली

दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा होता

पिंपरी: पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रोडवरील अत्यंत वर्दळीच्या भागात असलेल्या टेस्ट ऑफ इंदौर या कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात नागरिकांची मोठी पळापळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली, तरी काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दरम्यान, या घटनेत एक धक्कादायक बाब समोर आली असून, ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरात काही गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना व्यावसायिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा कसा ठेवण्यात आला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जर आगीत सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. संबंधित परिसर हा अत्यंत रहदारीचा असल्याने अशा ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून कारखाने चालवले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा