Sambhajinager News : मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप
Sambhajinager News: संभाजीनगर, महाराष्ट्र मिरर : मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचा दावा मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
2 मिनिट वाचन

Sambhajinager News : केवळ 44 अर्ज प्रलंबित; मराठा आरक्षणावर चर्चेची सर्व दारे खुली असल्याचे उदय सामंत यांचे आवाहन
Sambhajinager News: संभाजीनगर, महाराष्ट्र मिरर : मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे आणि जात वैधता प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचा दावा मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांसाठी आलेल्या 3 लाख 16 हजार 569 अर्जांपैकी 3 लाख 16 हजार 077 अर्जदारांना प्रमाणपत्रे देण्यात आली असून, केवळ 44 अर्ज प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ sambhajinager News
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ही आकडेवारी आहे. नियमांत न बसल्याने 548 अर्ज नाकारण्यात आले. याशिवाय एसईबीसीच्या 10 टक्के आरक्षणांतर्गत 2 लाख 95 हजार 305 प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
जात वैधतेचे 16 हजारांहून अधिक दाखले
जात पडताळणीसाठी मराठवाड्यात 21 हजार 051 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 16 हजार 110 जणांना वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली असून, 64 अर्ज अवैध ठरले आहेत. 2 हजार 34 अर्ज प्रलंबित असल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.https://maharashtramirror.com/ sambhajinager News
वैधता नाकारलेल्या अर्जांचे प्रमाण अत्यल्प असून, वंशावळ सिद्ध न होणे तसेच महसुली किंवा शालेय नोंदी उपलब्ध नसणे ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
ओबीसी आरक्षणाला धक्का नाही
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असले तरी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का दिला जाणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. दोन्ही समाजांच्या हिताचा विचार करून सरकार कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करत असल्याचे त्यांनी सांगितले.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींमध्ये नोंदींच्या याद्या प्रसिद्ध करणे आणि दवंडी देण्याचे काम 7 सप्टेंबरपासून सुरू झाल्याचे सांगितले. 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे घेतली जाणार आहेत. तसेच 57 लाख नोंदींचा पेनड्राइव्ह जरांगे यांना देण्यात आला असून, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा मराठवाडा दौराही सुरू असल्याचे ते म्हणाले.https://maharashtramirror.com/ sambhajinager news
सरकार चर्चेसाठी तयार
“तोडग्यासाठी सरकार अनेक पावले पुढे आले आहे. चर्चेची सर्व दारे खुली आहेत. जरांगे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कोंडी सोडवावी,” असे आवाहन सामंत यांनी केले. उर्वरित मागण्यांसाठी 60 ते 90 दिवसांचा कालावधी देऊन जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याची भूमिका घेतल्यास सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कुणबी दाखले, जात पडताळणी आणि हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणींबाबत बुधवारी सकाळी 10 वाजता स्मार्ट सिटी कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह प्रांताधिकारी, जात पडताळणी अधिकारी आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक उपस्थित राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
लातूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीशी संबंधित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल सामंत यांनी दुःख व्यक्त केले. सरकार या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील असून तरुणांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.




