मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा

• Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis भुजबळांच्या नादाला लागून जर आरक्षण देणार नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल, इशारा जरांगे पाटील यांनी दिला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manoj Jarange Patil On Devendra Fadnvis

•Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis भुजबळांच्या नादाला लागून जर आरक्षण देणार नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल, इशारा जरांगे पाटील यांनी दिला

जालना :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही छगन भुजबळांच्या नादाला लागून मराठा समाजाला आरक्षण देत नसाल तर तुमची सत्ता गमावून बसाल. असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.सरकारच तुम्ही चालवता म्हणून तुम्हाला टार्गेट करत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारचा खुर्चीत जीव असून आता त्यांची सत्ताच ठेवणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून दोन उपमुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटील केवळ मलाच टार्गेट करत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील पलटवार केला आहे. इतकेच नाही तर राज्यात मराठा ठोक क्रांती मोर्चावर देखील टीका केली. हे सर्व आंदोलने प्रवीण दरेकर करत असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाचे राज्यात कुठेही आंदोलन सुरू नसल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

सरकारकडून आता आमच्याशी कोणतीही चर्चा केली जात नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आरक्षण देणार नसेल तर आम्हाला त्यांचे उमेदवार पाडावेच लागतील. मात्र निवडून आणायचे की पाडायचे, याचा निर्णय 29 तारखेला होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. बारा महिन्यांपासून आम्ही लढा देत आहोत. तुम्ही आरक्षण देणार नसाल तर आम्हाला आमदारांना पाडावेच लागणार आहे. तुम्ही जर आरक्षण देणार नसेल तर आम्हाला हीच भाषा वापरावी लागेल, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Rohit Pawar : अजित पवार यांच्या वक्तव्यावर पुतणा रोहित पवार यांच्याकडून निशाणा

शेअर करा