मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manikrao Kokate : रमीचा व्हिडीओ व्हायरल, पण राजीनामा नाही – कोकाटेंची प्रतिक्रिया!"

•"खोटा आरोप!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manikrao Kokate

•"खोटा आरोप! कोर्टात खेचणार बदनामी करणाऱ्यांना" – मंत्र्यांचा इशारा

नाशिक :- राज्यातल्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादात सापडलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर यावर मौन सोडलं. राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच कोकाटेंनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, ते कुठलाही राजीनामा देणार नाहीत, उलट ज्या नेत्यांनी बदनामी केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.

"मी ऑनलाईन रमी खेळतच नाही. गेम स्कीप करत होतो, पण तुम्ही संपूर्ण व्हिडीओ दाखवलाच नाही. माझं कोणतंही बँक किंवा मोबाईल लिंक रमी अॅपसोबत जोडलेलं नाही," असं म्हणत त्यांनी आपल्यावरील आरोप फोल ठरवत खळबळजनक इशारा दिला – "माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही!"

मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या चर्चेवर त्यांनी ठाम भूमिका घेत "मी काही गैरकृत्य केलं नाही. ना मी चोरी केली ना कोणाचा विनयभंग. केवळ एक 11 सेकंदांचा व्हिडीओ दाखवून बदनामी केली गेली," असं ते म्हणाले. शिवाय, “मी दोषी ठरलो, तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना न भेटताच थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन,” असाही निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.

त्याच वेळी 'कृषी समृद्धी' या नव्या योजनेची घोषणा करून, कोकाटेंनी राजीनामा चर्चेला एकप्रकारे कलाटणी दिली. पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचा जीआरही आज प्रसिद्ध झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: Satara News : शाळकरी मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न; जमावाने तरुणास पकडून चोप दिला

शेअर करा