मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला, लष्कराच्या वाहनावर अनेक राऊंड गोळीबार

• जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला, लष्कराच्या वाहनावर अनेक राऊंड गोळीबार

•जम्मू-काश्मीरमधील सुंदरबनी भागात लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी 4-5 राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला. त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

ANI :- जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे लष्कराच्या वाहनावर अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला, त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

दुपारी 12.45 च्या सुमारास जम्मूच्या रौझरी येथील सुंदरबनी सेक्टरमध्ये लष्कराच्या वाहनावर 4 ते 5 राऊंड गोळीबार करण्यात आला. ही घटना घडताच दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

जम्मूचा सुंदरबनी परिसर जिथे हा हल्ला झाला तो एलओसीला लागून आहे. सकाळपासून येथे शोध मोहीम सुरू होती, त्यादरम्यान लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. मात्र, लष्कराने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.लष्कर स्वतः तेथे शोध मोहीम राबवत आहे. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गोळीबार एकाच बाजूने झाल्याचेही समोर आले आहे, गोळीबारानंतर हल्लेखोर लगेच पळून गेले आणि आजूबाजूच्या परिसरात लपून बसले. लष्कराच्या जवानांना प्रत्युत्तराची संधीही मिळाली नाही.

हेही वाचा: Beed News : बीड सरपंच खून प्रकरणात वकील उज्ज्वल निकम यांच्यावर मोठी जबाबदारी, विशेष सरकारी वकील

शेअर करा