मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!

रेड अलर्टचा इशारा!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!

रेड अलर्टचा इशारा! अजित पवारांचा तातडीचा आदेश – "जिल्हा प्रशासन सज्ज ठेवा" मुंबईत लोकल ठप्प, रस्ते जलमय – कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची मुभा

मुंबई :- मान्सूनने महाराष्ट्रात दमदार एंट्री केली असून, आभाळातून कोसळणाऱ्या धरणीगर्जेच्या पावसाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे हवामान विभागाने थेट रेड अलर्ट बजावला आहे, तर सिंधुदुर्गसाठी उद्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरला यलो अलर्ट देण्यात आला असून, अनेक जिल्हे मुसळधार पावसाच्या तडाख्याखाली आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले – "आपत्ती व्यवस्थापन सज्ज ठेवा, नागरिकांचे प्राण वाचवणे हीच प्राथमिकता असली पाहिजे!" शेती, पिकांचे नुकसान, जनावरांची हानी, घरांचे नुकसान यावर तातडीने सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोकलसेवा उशिराने किंवा रद्द होत असून, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयातून लवकर सोडण्याची मुभा देण्यात आली आहे, जेणेकरून ते सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील.

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या घाट भागांमध्येही पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. संपूर्ण राज्यभरात प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Panvel News : मान्सून आला आणि टपाल नाक्यावरील वीस कोटींचा रस्ता पाण्यात गेला……

शेअर करा