मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : तेजस्वींची 'संचालक' नेमणूक की भाजपकडून ठाकरे गटाला रणनीतिक झटका?

•मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर; राजकीय घडामोडींना वेग

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : तेजस्वींची 'संचालक' नेमणूक की भाजपकडून ठाकरे गटाला रणनीतिक झटका?

•मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर; राजकीय घडामोडींना वेग

मुंबई | राजकारणात काही घडामोडी ‘नियुक्त्या’च्या माध्यमातून सुरू होतात आणि त्यामागचे संकेत फार काही सांगून जातात. काहीसं असंच चित्र तेजस्वी घोसाळकर यांच्या मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी झालेल्या नेमणुकीनंतर दिसून येत आहे. ठाकरे गटाची नाराजी व्यक्त करणाऱ्या तेजस्वी यांचा भाजपकडे झुकाव असल्याची चर्चा पुन्हा तापली आहे.

दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्याच पत्नी तेजस्वी यांची नेमणूक करण्यात आली. मात्र ही नियुक्ती मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळेच अर्थ काढले जात आहेत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यासंबंधी स्पष्ट केले की, संचालक मंडळाने सद्भावनेतून ही नियुक्ती केली. "नियुक्ती कायदेशीर असून ती केवळ बँक व्यवहारापुरती आहे," असा दावा केला असला तरी, तेजस्वी यांच्या ‘मूक पावला’तून भाजपकडे वाटचाल सुरू झालीय का, असा सवाल उपस्थित होतोय.

प्रवीण दरेकर यांनी या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "मराठी माणूस आमच्यासोबत आहे, केवळ भाषणं देणाऱ्यांवर नाही," असं स्पष्ट करत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदेंच्या भूमिकेशी जोडले.

"मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यामागे फडणवीस आणि मोदी सरकारचा मोठा वाटा आहे," असे सांगत त्यांनी भाजपचा मराठी मतदारांवरील हक्क अधोरेखित केला.

तेजस्वींची नियुक्ती ही एक केवळ औपचारिक भरती नसून, भाजपच्या 'मुंबई रणनिती'तील एक रणनीती आहे, असेच संकेत सध्या मिळत आहेत. विशेषतः महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल ठाकरे गटाला चकवा देण्याचा प्रयत्न मानला जात आहे.

हेही वाचा: Ganja Seized At Kalyan Station : पुरी एक्स्प्रेसने ‘हाय’ करायचा प्लॅन फसला! कल्याण स्थानकात गांजासह दोघे जेरबंद

शेअर करा