मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ganja Seized At Kalyan Station : पुरी एक्स्प्रेसने ‘हाय’ करायचा प्लॅन फसला! कल्याण स्थानकात गांजासह दोघे जेरबंद

• कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई; 21 किलो गांजासह तस्कर अटकेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

•कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई; 21 किलो गांजासह तस्कर अटकेत

कल्याण | पुरी एक्स्प्रेसने मुंबईकडे गांजा घेऊन आलेल्या दोघा तस्करांना कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी दुपारी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. संयुक्त कारवाई करत कल्याण गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने या दोघांकडून तब्बल 21 किलो गांजा हस्तगत केला. या अंमली पदार्थाची किंमत 4.17 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेहताब आलम इरशाद आलम शेख (35 वय, मुंब्रा, ठाणे), लाल अहमद मोहम्मद अमीन कोटकी (27 वय, कलबुर्गी, कर्नाटक) दोघेही ओरिसाच्या संबलपूर जिल्ह्यातून पुरी एक्स्प्रेसने गांजा घेऊन आले होते. कल्याण स्थानकावर ते उतरून बाहेर पडत असताना त्यांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या. फलाट क्रमांक 5 वर गस्त घालणाऱ्या पथकाने दोघांना अडवले. पिशव्यांची झडती घेतली असता त्यात 21 किलो गांजा आढळला. तेथूनच त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसी चौकशीत आरोपींनी ही तस्करी पहिल्यांदाच करत असल्याचे नाकारले असून, त्यांनी याआधीही गांजा विक्री केली असल्याची कबुली दिली. या दोघांमुळे अंमली पदार्थांच्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत सुळे, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली. त्यांच्या या यशस्वी कारवाईमुळे कल्याण परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा: Eng vs Ind 1st Test Day-1 Live : शुबमनच्या नेतृत्त्वात नव्या युगाची सुरुवात! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला भव्य प्रारंभ

शेअर करा