मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : "फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा – शेतकरी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय!"

नोंदणी फी माफ, अंशकालीन शिक्षकांना संधी, हातमाग कर्मचाऱ्यांना थकबाकी – मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे ठोस निर्णय

V
Vivek

1 मिनिट वाचन

Devendra Fadnavis

नोंदणी फी माफ, अंशकालीन शिक्षकांना संधी, हातमाग कर्मचाऱ्यांना थकबाकी – मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे ठोस निर्णय

मुंबई : आजची मंत्रिमंडळ बैठक ठरली ‘जनतेच्या अपेक्षांची पूर्तता’ करणारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत, शेतकरी, शिक्षक, कामगार, अधिकारी अशा अनेक घटकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी दिलासा – ‘नोंदणी फी’ आता शून्य!
शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी लागणारी नोंदणी फी आता शेतकऱ्यांना भरावी लागणार नाही. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत – आर्थिक ओझ्याखाली दबललेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक घोषणा.

शाळांना मिळणार नवे बळ – अंशकालीन निदेशक धोरणात सुधारणा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीसाठी नवीन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील आणि शाळांमध्ये व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.

हातमाग कामगारांना न्याय – थकबाकी मंजूर
नागपूर येथील हातमाग महामंडळाच्या 195 कर्मचाऱ्यांना 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून थांबलेली मागणी पूर्ण झाली असून, कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे.

मंत्रिमंडळाचे इतर महत्त्वाचे निर्णय:

  • वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान: इचलकरंजीला 657 कोटी आणि जालन्याला 392 कोटींचे पाच वर्षांत अनुदान मंजूर.
  • न्यायालयीन यंत्रणेसाठी भर: मा. शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार टंकलेखक पदे निर्माण.
  • "मॅग्नेट" प्रकल्पासाठी नवे नेतृत्व:* पणन मंत्री असतील संस्थेचे अध्यक्ष.
  • FDCM मध्ये सुधारणा: 1,351 पदांचा आकृतीबंध मंजूर.
  • कृषि अधिकाऱ्यांची पदनामे बदलून सन्मान: "उप कृषि अधिकारी" आणि "सहायक कृषि अधिकारी".
  • सामाजिक विकासासाठी मान्यता: सुहित जीवन ट्रस्टच्या कार्यशाळेला मान्यता.
  • पत्रकार क्लब ऑफ नागपूरसाठी अटींमध्ये बदल.
  • शेअर करा