मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : अजित पवारांचे डॅमेज कंट्रोल, आज भाजपची बैठक होणार, उद्धव ठाकरे गटाने बनवली ही रणनीती

Maharashtra Politics Latest Update : या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics Latest Update : या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

Maharashtra Politics Latest Update : या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

मुंबई :- विधानसभा निवडणुकीसाठी Vidhan Sabha Election सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. जागावाटपावरून महाविकास आघाडी Mahavikas Aghadi आणि महायुतीच्या Mahayuti बैठकीमध्ये गदारोळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील आहेत. दरम्यान, आज भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल बैठक घेऊन पक्षश्रेष्ठींना आगामी निवडणुकीसाठी तयार राहण्यास सांगितले होते.

अजित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठकही घेतली. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्यासोबत अधिकाऱ्यांची बैठक संपली. 21 जुलै रोजी अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीची जबाबदारी माजी आमदार विलास लांडे यांच्याकडे असून, या बैठकीत आणखी काही निर्णय होण्याची शक्यता आहे.शरद पवार 20 जुलै रोजी पिंपरी चिंचवडमध्ये सभा घेणार असून, त्यानंतर अजित पवार सभा घेणार आहेत. त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या राजकारणात काका-पुतण्याची लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातील Ajit Pawar अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्षही निर्णय घेऊ शकतात. Maharashtra Politics Latest Update

शिंदे गटाने कल्याण पूर्व आणि उल्हासनगर येथील पदाधिकाऱ्यांची कमिटी बरखास्त केली असून लवकरच नवीन कमिटी स्थापन करणार आहे. लोकसभेत चांगली कामगिरी न केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे यांच्या उच्च नेते मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरची कमिटी बरखास्त केली आहे. लोकसभेच्या अपयशानंतर महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली असून विधानसभेपूर्वीच महायुती मोठा बदल करण्यात येत आहे. Maharashtra Politics Latest Update

हेही वाचा: Wagh Nakh in Mumbai : छत्रपती शिवाजी महाराजांचा 'वाघ नख' लंडनहून मुंबईत आणले, साताऱ्यात जल्लोषात स्वागत

शेअर करा