मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : "ठाकरे गटाला नवा धक्का!" — माजी नगरसेविका सुजाता सानप शिंदे गटात, कुलाबा प्रभागात नवा रंगतदार राजकीय खेळ

" धनुष्यबाण गहाण टाकणारे आम्ही नाही", शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : "ठाकरे गटाला नवा धक्का!" — माजी नगरसेविका सुजाता सानप शिंदे गटात, कुलाबा प्रभागात नवा रंगतदार राजकीय खेळ

"धनुष्यबाण गहाण टाकणारे आम्ही नाही", शिंदेंचा ठाकरे गटावर घणाघात

मुंबई :-; मुंबई महापालिकेच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा नाट्यमय वळण! कुलाबा प्रभागातील माजी नगरसेविका सुजाता सानप यांनी शिवसेना (ठाकरे) गटाचा राजीनामा देत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जोरदार प्रवेश केला. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ‘बाहेरून छोटी पण आतून मोठी’ राजकीय हालचाल मानली जात आहे.

सानप यांचा प्रवेश अचानक झालेला नसून त्यामागे ठोस गणित आणि बळकट नेटवर्क आहे. यावेळी त्यांचे दीर आणि माजी नगरसेवक गणेश सानप, तसेच नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे आणि इतर पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले. या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गणेश सानप हे बेस्ट समितीचे माजी सदस्य असून, त्यांच्या स्थानिक राजकीय पकडीत सत्ताधारी गटाला नवा शस्त्रसज्ज वारं मिळालाय. सुजाता सानप या स्थायी समितीत सक्रीय होत्या. या दोघांचा प्रवेश म्हणजे कुलाबा भागात ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा आहे.

शिंदे यांची टीका — ‘शिवसेना आमची खरी!’
पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या शैलीत आक्रमक पवित्रा घेत, “शिवसेना आम्हीच चालवत आहोत, धनुष्यबाण गहाण टाकणारे आम्ही नाही. जनतेने आमचा विचार स्वीकारला,” अशी टीका केली. त्यांच्या वक्तव्यात आत्मविश्वास होता आणि ठाकरे गटासाठी सूचक इशाराही.

महापालिका निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतसे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा पक्षांतराचा ओघ वाढतोय. या हालचाली ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरणार हे निश्चित!

हेही वाचा: Varsha Gaikwad : नालेसफाईत ‘हात की सफाई’? – खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप

शेअर करा