मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Political Update : पालकमंत्रीपदाचा वाद कायम असतानाच ध्वजारोहणाचा निर्णय जाहीर

Maharashtra Breaking News : रायगडमध्ये अदिती तटकरे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Political Update : पालकमंत्रीपदाचा वाद कायम असतानाच ध्वजारोहणाचा निर्णय जाहीर

Maharashtra Breaking News : रायगडमध्ये अदिती तटकरे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन करणार ध्वजारोहण

मुंबई :- रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेला तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे Aditi Tatkare यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. तर, नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन Girish Mahajan ध्वजारोहण करणार आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी 18 जानेवारी रोजी रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांची, तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महायुतीतील मतभेदांमुळे काही तासांतच ही नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच दोन्ही नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे, पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी जोरदार मागणी होती. मात्र, नुकत्याच एका कार्यक्रमात गोगावले यांनी आपली भूमिका मवाळ केल्याचे दिसून आले. "पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नाही तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल," असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यातून काहीतरी तोडगा निघाला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा पुणे ऐवजी बीड येथे ध्वजारोहण करणार आहेत. पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच बीडला जाणार आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शेअर करा