मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

महाराष्ट्र होरपळला!

अकोल्यात पारा ४५ अंशांच्या पार; पुण्यातही सूर्याचा प्रकोप

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

महाराष्ट्र होरपळला!

अकोल्यात पारा ४५ अंशांच्या पार; पुण्यातही सूर्याचा प्रकोप

पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट’

  • राज्यात सर्वात जास्त तापमान अकोल्यात (४५.१°C); पुण्याच्या लोहगावमध्ये ४३.८ अंशांची नोंद
  • हवामान विभागाकडून नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
  • पुणे: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरे अक्षरशः तापली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्याच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला हे ४५.१°C तापमानासह राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले असून, पुणे आणि परिसरातही तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

    पुणेकर घामाघूम; लोहगावचा पारा ४३ अंशांच्या पुढे
    पुणे शहरातही उष्णतेने उच्चांक गाठला आहे. पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर भागात ४१.६°C तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी जास्त आहे. तर लोहगाव परिसरात पारा ४३.८°C वर पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी १८ मे पर्यंत पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून तापमान ४१ ते ४२ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

    राज्यात कुठे कशी आहे स्थिती?
    मराठवाडा आणि विदर्भात उन्हाची तीव्रता सर्वाधिक आहे. जळगाव (४४.३°C), वर्धा (४३.८°C) आणि छत्रपती संभाजीनगर (४३.४°C) या शहरांमध्येही उष्णतेची लाट जाणवत आहे. कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली असून, मुंबईतही आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे.

    पुढील ५ दिवसांचा अंदाज : ‘यलो अलर्ट’ जारी
    हवामान विभागाने १२ ते १४ मे या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः विदर्भात ही स्थिती १६ मे पर्यंत कायम राहू शकते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

    शेअर करा