मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Election 2024 : विदर्भातील काही जागांवर काँग्रेस-उद्धव ठाकरे गटात संघर्ष, संजय राऊत म्हणाले- राहुल गांधींशी बोलणार!

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेने अमरावती आणि रामटेक या जागा काँग्रेससाठी सोडल्या होत्या, त्यामुळे शिवसेनेला विदर्भात चार ते पाच जागा मिळाव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sanjay Raut: "BJP is 'D Gang'! - Sanjay Raut's explosive attack"

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेनेने अमरावती आणि रामटेक या जागा काँग्रेससाठी सोडल्या होत्या, त्यामुळे शिवसेनेला विदर्भात चार ते पाच जागा मिळाव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

मुंबई :- महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा प्रश्न सुटत नाही. Maharashtra Election 2024 अशा अनेक जागा आहेत ज्यांवर तिन्ही आघाडीच्या जागा आपापल्या परीने दावा करत आहेत. दरम्यान, विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेमध्ये वाद निर्माण झाला आहे.दोन्ही पक्षांमध्ये 20 ते 25 जागांवर मतभिन्नता आहे, त्यात सर्वात मोठा मुद्दा विदर्भातील जागांवर आहे, येथे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा आहेत. Maharashtra Assembly Election 2024

शिवसेनेने अमरावती आणि रामटेक या जागा काँग्रेससाठी सोडल्या होत्या, त्यामुळे शिवसेनेला विदर्भात चार ते पाच जागा मिळाव्यात, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. विदर्भात पक्ष वाढवण्यासाठी तिथे लढणे आवश्यक असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "मी सकाळी मुकुल वासनिक यांच्याशी बोललो आहे. आज मी राहुल गांधी यांच्याशीही बोलणार असून, जागावाटपाचा प्रलंबित निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. अनेक जागांवर निर्णय झाले आहेत.अनेक जागांवर निर्णय झाले आहेत. काही जागा अशा आहेत ज्यांवर निर्णय होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीत आहेत, समाजवादी पक्ष, पीडब्ल्यूडीही आहेत.

भाजपाचा पराभव आम्हाला करायचा आहे. या महाराष्ट्रात भ्रष्ट सरकार आहे. भाजपाशी कसं लढायचं ते आम्हाला माहित आहे. अमित शाह, भाजपा, मिंधे गटाने सर्वात जास्त त्रास आम्हाला दिला. आम्ही तुरुंगात जाऊन आलो. टार्गेटवर कोण आहे? काय होऊ शकतं? हे आम्हाला माहिती आहे. भाजपच्या या बिष्णाई गँग आहेत. त्यांच्याकडे अशी हत्यारं नाहीत. पण ईडी, सीबीआयचा वापर करुन आम्हाला त्रास दिला. हे सर्व सहन करुन आम्ही उभे आहोत” असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: Vidhansabha Election 2024 Update : निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारला झटका, निविदा, जीआर रद्द करावे लागले

हेही वाचा: Salman Khan : सलमान खानच्या शेतघराबाहेरील टेहळणीप्रकरणी आरोपीला अटक

शेअर करा